Rohit Sharma, Rahul Dravid & Hardik Pandya Update: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे सचिव जय शाह यांनी अलीकडेच रोहित शर्माच्या पुढील वर्षीच्या ICC T20 विश्वचषक स्पर्धेतील सहभागाबाबतच्या प्रश्नांवर एक विधान की आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षक गटाच्या कार्यकाळाचा निर्णय दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर घेतला जाईल असे शाह यांनी नमूद केले. याशिवाय हार्दिक पंड्याला झालेल्या दुखापतीबाबतही शाह यांनी अपडेट दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रोहित शर्माचं काय ठरलं?
क्रिकेटप्रेमींमधील चर्चांनुसार, रोहितने BCCI असे कळवले आहे की तो भारतासाठी टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास फारसा उत्सुक नाही. मध्यंतरी अशीही चर्चा पसरली होती की भारतीय बोर्ड रोहितला T20 विश्वचषकात संघाचे नेतृत्व करण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु शाह यांनी या विषयावर कोणतीही स्पष्ट प्रतिक्रया देण्यास नकार दिला. आगामी टी २० आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध एकदिवसीय सामन्यांसाठी रोहितला विश्रांती देण्यात आली आहे परंतु या महिन्याच्या अखेरीस कसोटी मालिकेपूर्वी तो संघात सामील होईल.
रोहित शर्मा संघात असण्याबाबत जय शाह यांनी मुंबईत WPL २०२४ च्या लिलावाच्या वेळी पत्रकारांना सांगितले की, “सध्या स्पष्टता असण्याची काय गरज आहे? टी-20 विश्वचषक जूनमध्ये सुरू होत आहे. त्याआधी आपल्यासमोर आयपीएल आहे आणि अफगाणिस्तानविरुद्धची मालिकाही आहे.”
राहुल द्रविड आणि टीमबरोबर काय चर्चा झाली?
दरम्यान, विश्वचषक आणि दक्षिण आफ्रिका दौर्याच्या मधला वेळ इतका कमी होता की राहुल द्रविड आणि त्याच्या संघाला मुदतवाढ देऊनही, कार्यकाळाची औपचारिक पुष्टी होऊ शकली नाही, मात्र दक्षिण आफ्रिकेतून माघारी आल्यावर याविषयी निर्णय घेतला जाईल. याविषयी शाह म्हणाले की, “आम्ही मुदतवाढ दिली आहे, परंतु आम्हाला करार निश्चित करायचा आहे. आम्हाला अजिबात वेळ मिळाला नाही, विश्वचषक संपल्यावर माझी त्यांच्यासह (द्रविड व गट) बैठक झाली आणि आम्ही परस्पर सहमतीने असे ठरवले की दक्षिण आफ्रिकेतून संघ परतला की आपण निर्णय घेऊ.”
हे ही वाचा<< “BCCI एवढे पैसे नसतील पण..”, IND vs SA सामना रद्द होताच गावसकर भडकले; म्हणाले, “पूर्णपणे खोटं..”
हार्दिक पंड्याच्या प्रकृतीचा अपडेट
दुसरीकडे शाह यांनी हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत सुद्धा अपडेट दिला आहे. पंड्या नोव्हेंबरमध्ये आयसीसी विश्वचषक स्पर्धेत घोट्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. पुण्यातील बांगलादेश विरुद्धच्या विश्वचषक सामन्यात हार्दिकच्या डाव्या घोट्याचे लिगामेंट फाटले होते, त्यामुळे तो स्पर्धेच्या उर्वरित सामन्यातून बाहेर पडला. हार्दिक पंड्याच्या तब्येतीबाबत शाह म्हणाले की, “आम्ही त्याचे निरीक्षण करत आहोत. तो फक्त एनसीएमध्ये आहे, तो खूप मेहनत घेत आहे आणि तो तंदुरुस्त झाल्यावर आम्ही तुम्हाला योग्य वेळी कळवू. तो अफगाणिस्तान मालिकेपूर्वीही फिट होऊ शकतो.”