Rohit Sharma posted a video of the memory from 2024 on Insta : मेलबर्न बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १८४ धावांनी पराभव केला. त्याचबरोर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माला टीकेचा सामना करावा लागत आहे. अशात २०२४ वर्ष संपण्यापूर्वीच भारतीय कर्णधार रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये चाहत्यांनी त्याला निवृत्ती न घेण्याचे भावनिक आवाहनही केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्मासाठी २०२४ हे काही गोड आणि कडू आठवणी देणारे राहिले. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केली असतानाच, तो कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार आणि खेळाडू म्हणून पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.

रोहित शर्माने मानले आभार –

भारतीय कर्णधार रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले की, ‘सर्व चढ-उतार आणि इतर सर्व गोष्टींसाठी सरत्या २०२४ या वर्षाचे आभार’. यासह त्याने हार्ट इमोजीही तयार केला आहे. त्याने पोस्ट केलेल्या व्हिडीओत २०२४ मधील काही खास आठवणी आहेत. ही पोस्ट पहिल्यानंतर चाहते सोशल मीडियावर भावुक झाले आहेत. सूरज बाबा नावाच्या युजरने लिहिले की, ‘रोहित भाई, तुम्ही खुश रहा. हीच माझी प्रार्थना आहे आणि निवृत्तीबद्दल बोलू नका. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘आमचा तुमच्यावर विश्वास आहे कॅप्टन.’

हेही वाचा – Jasprit Bumrah : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केला २०२४ चा सर्वोत्कृष्ट कसोटी संघ, कर्णधारपदी कमिन्स नव्हे तर ‘या’ भारतीय खेळाडूची वर्णी

भारताने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे पटकावले जेतेपद –

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरले. यासह त्याने फलंदाजीतही खास योगदान दिले. तो (२५७) टी-२० विश्वचषक स्पर्धेत संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने या स्पर्धेत अनेक शानदार खेळ्या साकारल्या होत्या. विशेष म्हणजे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ धावांची शानदार खेळी केली होती.

हेही वाचा – MS Dhoni : ‘मला PR ची गरज नाही कारण…’, माहीने सोशल मीडियाबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘कोणाचे किती…’

कसोटी क्रिकेटमध्ये ठरला फ्लॉप –

रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने मायदेशात इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळवले होते. यानंतर न्यूझीलंडविरुद्धची मालिका मायदेशात ०-३ अशी मालिका गमवावी लागली. ज्यामुळे भारतीय संघाला तब्बल १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला.. या व्यतिरिक्त २०२४ मध्ये, तो कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्याने १४ कसोटी सामन्यात अवघ्या ६१९ धावा करता केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma post on instagram and saying thank you to year 2024 video goes viral after melbourne test vbm