Rohit Sharma to Play Ranji Trophy? : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. गेल्या १० कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माची बॅट शांतट होती. यानंतर रोहितने देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असा अनेक माजी खेळाडूंनी सल्ला दिला आहे. यानंतर आता रोहित शर्मा रणजी ट्रॉफीच्या मुंबई संघासह सराव करण्यासाठी पोहोचला आहे.

रोहित शर्मा रणजी ट्रॉफी खेळणार?

आज म्हणजेच मंगळवारी (१४ जानेवारी) सकाळी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या रणजी ट्रॉफी सराव सत्रात भाग घेणार असल्याची माहिती भारतीय कर्णधार रोहित शर्माने मुंबई संघ व्यवस्थापनाला दिली होती. यासह रोहित शर्मा वानखेडे स्टेडियमवर सकाळीच सरावासाठी पोहोचल्याचा व्हीडिओही रेव्ह स्पोर्ट्सने शेअर केला आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी रोहित शर्माने एमसीए-बीकेसी मैदानावर पुन्हा सराव सुरू केला आहे.

Jasprit Bumrah : Kapil Dev shoots down 1983 World Cup teammates controversial take on Bumrah's workload
Jasprit Bumrah : ‘बुमराहशी माझी तुलना करू नका…’, वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे वर्कलोड मॅनेजमेंटबाबत मोठं वक्तव्य
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
BCCI New Guidelines For Indian Players and Their Wife & Family after disastrous Australia series
BCCI ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियाला लावणार शिस्त, खेळाडूंच्या कुटुंबासाठी नवीन नियम; पत्नी आणि गर्लफ्रेंड…
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Gautam Gambhir Wants Yashasvi Jaiswal As Next India Captain After Rohit Sharma at loggerheads with Ajit Agarkar
India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
zara dar pornhub video income
Zara Dar: PhD सोडून पॉर्नहब निवडलं; आता अभ्यासाचे व्हिडीओ टाकून कमावते अधिक पैसे; कोण आहे जारा डार?
Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना

हेही वाचा – India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद

मुंबई संघ त्यांच्या पुढील रणजी करंडक साखळी फेरीसाठी सेंटर-विकेट सराव सत्र करणार आहे. मुंबईचा सामना जम्मू आणि कश्मीर संघाविरूद्ध असणार आहे. एमसीएच्या एका सूत्राने सांगितले की, रोहित शर्माने अद्याप रणजी सामन्यासाठी तो उपलब्ध असेल की नाही याबाबत माहिती दिलेली नाही. रणजी ट्रॉफी लीग सामने खेळायचे की नाही यावर तो विचार करत आहेत.

हेही वाचा – Wankhede Stadium: बाळासाहेबांचा इशारा अन् शिवसैनिकांनी वानखेडेचं पिच खोदलं, पाकिस्तान बरोबरच्या ‘त्या’ सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं?

एमसीएच्या एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “तो मुंबई रणजी करंडक संघासोबत सराव सत्रासाठी येणार आहे. तो जम्मू-काश्मीरविरुद्धचा पुढील रणजी सामना खेळणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. वेळ आल्यावर तो एमसीएला याबाबत माहिती देईल.” रोहित शर्मा मुंबई संघाकडून २०१५ मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध अखेरचा रणजी सामना खेळला होता. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माची बॅट शांत होती. चार कसोटी सामन्यांमध्ये त्याने १०.९३ ची सरासरीने ३,९, १०, ३, ६ धावा केल्या. त्यानंतर सिडनी मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने विश्रांती घेतली.

हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्मासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी अखेरची स्पर्धा? ‘या’ दिवशी अखेरचा सामना खेळण्याची शक्यता; मोठी अपडेट आली समोर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले होते की, सर्वांनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे. सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावल्यानंतर गंभीर म्हणाला होता, “प्रत्येकाने देशांतर्गत क्रिकेट खेळावे असे मला नेहमीच वाटते. देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व दिले पाहिजे. फक्त एकच सामना नाही, तर प्रत्येकाने उपलब्ध असल्यास आणि लाल चेंडूचे क्रिकेट खेळण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे. हे अगदी सोपे आहे. जर तुम्ही देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व दिले नाही तर तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये हवे ते खेळाडू कधीच मिळणार नाहीत.

हेही वाचा – Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा

रणजी ट्रॉफीची उर्वरित फेरी २३ जानेवारीपासून सुरू होत असून विराट कोहलीही दिल्लीकडून रणजी सामना खेळतो की नाही याची सर्वांनाच उत्सुकता असणार आहे. कोहली संघाकडून शेवटचा २०१२ मध्ये खेळला होता. बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला आहे. पण त्यांनी आपल्या करारबद्ध खेळाडूंसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक केलेलं नाही.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय फलंदाज शुबमन गिल कर्नाटकविरुद्ध पंजाबकडून खेळताना दिसू शकतो. गिलचा ऑस्ट्रेलिया दौराही निराशाजनक होता, चांगली सुरुवात करूनही त्याला सातत्याने तशी कामगिरी करता आली नाही. तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याचा स्कोअर ३१, २८,१, २० आणि १३ होता.

Story img Loader