IND vs WI 2nd ODI: रविवारी (२४ जुलै) पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध झालेला एकदिवसीय सामना भारताने दोन गडी राखून जिंकला. अक्षर पटेल हा या विजयाचा ‘हिरो’ ठरला. त्याने धमाकेदार अर्धशतकीय खेळी करून रोमांचक सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. या कामगिरीनंतर सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कौतुक करणाऱ्यांमध्ये भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचादेखील समावेश आहे. रोहितने अक्षरसाठी एक खास ट्वीट केले आहे. रोहितचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अक्षर पटेलने मोक्याच्या क्षणी ३५ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. यामध्ये पाच षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. त्याच्या कामगिरीमुळेच भारताला शेवटच्या षटकामध्ये विंडीजवर विजय मिळवता आला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने अक्षर पटेलचे गुजराती भाषेतून कौतुक केले. रोहितने ट्वीट केले, “वाह. काल रात्री भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. बापू बढू सारू छे @अक्षर पटेल”.

Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

‘बढू सारू चे’ चा मराठीमध्ये अर्थ ‘सर्व काही ठीक आहे’, असा होतो. संघातील सर्व खेळाडू अक्षर पटेलला ‘बापू’ म्हणून हाक मारतात. त्यामुळे रोहितने अक्षरसाठी केलेल्या ट्वीटने चाहत्यांची मने जिंकली आहेत. रोहितच्या ट्विटनंतर अक्षरनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले, “बडू सारू छे. रोहित भाई, धन्यवाद चिअर्स”. दोघांच्या गुजरातीमधील संभाषणावर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतलेली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना २७ जुलै रोजी होणार आहे. तिसरा सामना जिंकून भारतीय संघ वेस्ट इंडीजला ‘क्लीनस्वीप’ करण्याचा प्रयत्न करेल.