Rohit Sharma Pre Match Press Conference Against Pakistan: भारतीय कर्णधार रोहित शर्माने आशिया चषक २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५.१२ वाजता सुरू झालेल्या या पत्रकार परिषदेत हिटमॅनने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या मोठ्या सामन्यापूर्वी रोहित शर्माने खेळाडूंच्या दुखापती, त्यांची रणनीती आणि संघाच्या तयारीविषयी सांगितले. पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार काय म्हणाला ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आशिया चषक स्पर्धेत आजपर्यंत भारत-पाकिस्तान फायनल झालेली नाही. यावेळी तुम्हाला काय वाटते? हा प्रश्न सर्वप्रथम रोहित शर्माला विचारण्यात आला होता, ज्याच्या उत्तरात त्याने सांगितले की, यावेळेसही तो तुम्हाला स्पर्धेत दिसेल. आशिया कप ही मोठी स्पर्धा आहे.

आशिया चषकात कोणताही संघ कमकुवत मानता येणार नाही –

प्लेइंग इलेव्हनबद्दल रोहित शर्मा म्हणाला, “आमच्याकडे प्रतिभावान खेळाडूंचा मोठा समूह आहे. अशा परिस्थितीत कधीकधी प्लेइंग इलेव्हनची निवड करणे कठीण काम होते. आशिया चषकात कोणताही संघ कमकुवत मानता येणार नाही. कोणताही संघ कोणालाही हरवू शकतो. आपण केलेल्या प्रत्येक चुकीतून आपण शिकतो. टीम इंडियाच्या फलंदाजांचा अनुभव या स्पर्धेत उपयोगी पडेल. आम्हाला विश्वचषकापूर्वी आमच्या सर्व बॉक्सवर टिक करायचे आहे.”

आमच्याकडे शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ नसतील, पण…

डेथ ओव्हरच्या प्रश्नावर रोहित म्हणाला, “पाकिस्तान एक मजबूत संघ आहे, त्यांच्यासमोर आव्हान मोठे असेल. सामना जिंकण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. नाणेफेक जिंकणे, सामना जिंकणे क्वचितच घडते. अल्पकालीन उद्दिष्टे नेहमीच कार्य करतात. आमचे पहिले उद्दिष्ट पाकिस्तानला पराभूत करणे आहे, मग पुढे पाहू. आमच्याकडे शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ नसतील, परंतु आमच्याकडे जे काही संसाधने आहेत, त्याने आम्ही सामना करू.”

मी गेल्या दोन वर्षात माझा गेम प्लॅन बदलला –

रोहित शर्मा स्वत:च्या गेम प्लॅन बदल बोलताना म्हणाला, “तुम्हाला माझा रेकॉर्ड थोडा विचित्र वाटेल. गेल्या दोन वर्षांत मी वेगळ्या पद्धतीचे क्रिकेट खेळले आहे. धोका पत्करून फलंदाजी केली. आघाडीचा फलंदाज म्हणून संघाला चांगल्या स्थितीत ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. मी जमेल तेव्हा चांगल्या लयीत येण्याचा प्रयत्न करेन. सहजासहजी हे सोडणार नाही.”