Virat Kohli 100 Runs: आशिया चषक स्पर्धेत भारताने अफगाणिस्तानवर १०१ धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी स्पष्ट दिसत होता. कोहलीने गुरुवारी ६१ चेंडूत नाबाद १२२ धावा करून आपले पहिले टी-२० शतक झळकावले आणि त्याचे ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकात १०२० दिवसांच्या दुष्काळाला मोडीत काढले. जगभरातून विराटवर कौतुकाचा वर्षाव होत असताना त्याचे मित्र व सहखेळाडू मात्र कोहलीची चांगली मज्जा घेत आहेत. असाच एक व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे विराट आणि कर्णधार रोहित शर्माच्या मजेशीर गप्पा पाहायला मिळत आहेत.
आपण व्हिडीओमध्ये पाहू शकता की सामन्याच्या नंतर विराट आणि रोहित निवांत बसले आहेत, तेव्हा विद्यमान कर्णधार माजी कर्णधाराची मुलाखत घेऊ लागला, “विराट तुझे खूप अभिनंदन, तुझे ७१ वे शतक ज्याची पूर्ण भारत प्रतीक्षा करत होता, तू कदाचित याची जास्त वाट पाहिली असशील. तू जी खेळी खेळलास त्यात अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या, तू जे गॅप शोधलेस, शॉट्स खेळलास ते कमाल होते. जरा आम्हाला सांगा की या खेळाची सुरुवात कशी झाली आणि खेळताना कसे वाटले?” असे म्हणत रोहितने विराटला हिंदी भाषेत प्रश्न केला.
हे ऐकताच विराटने आश्चर्याने बघत, तू पहिल्यांदाच माझ्याशी एवढ्या शुद्ध हिंदीत बोलत आहेस असे उत्तर दिले.
Video: १०० धावा पूर्ण करताच विराटचा डान्स झाला Viral; चाहते म्हणतात “आशिया चषक नको पण..
रोहित शमाने अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीतून विश्रांती घेतल्याने , कोहलीने कर्णधार केएल राहुलसह फलंदाजीची सुरुवात केली आणि संधीचा पुरेपूर उपयोग केला.कोहलीने जवळजवळ तीन वर्षांनंतर शंभरीचा आकडा गाठला. हे त्याचे ७१ वे शतक त्याला महान रिकी पाँटिंगच्या बरोबरीने सर्वाधिक शतकांच्या यादीत स्थान मिळवून दिले आहे. सचिन तेंडुलकर अजूनही १०० आंतरराष्ट्रीय शतकांसह या यादीत प्रथम आहे.
Video: इथे कोहलीने शतक लगावताच तिथे आजोबांनी… IND vs AFG नंतरचा सर्वात सुंदर क्षण पाहा
सुरेश रैना, केएल राहुल , रोहित शर्मा , दीपक हुडा आणि सूर्यकुमार यादव यांच्यानंतर विराट कोहली हा भारतासाठी शंभर नंबरी धावसंख्या नोंदवणारा सहावा भारतीय फलंदाज ठरला.कोहलीने सर्वात कमी वेळेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३५०० धावांचा टप्पाही ओलांडला, रोहित शर्मानंतर असे करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज बनला, रोहितने आतापर्यंत फॉर्मेटमध्ये ३६२० धावा केल्या आहेत.