Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting: यंदाची IPL स्पर्धा सुरू होण्याआधी सर्वाधिक चर्चा होती ती हार्दिक पांड्याची. कारण गुजरात टायटन्सचं कर्णधारपद सोडून हार्दिक पुन्हा मुंबईकडे परतला. त्याचवेळी रोहित शर्मानं कर्णधारपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केलं. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत हार्दिक पांड्याला त्या चर्चेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही हार्दिकला प्रभावी कामगिरी करता न आल्यामुळे तो चाहत्यांच्या टीकेचा धनी झाला आहे. त्यातच गेल्या आठवड्यात मुंबईतील BCCI च्या मुख्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीची सध्या जोरदार चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राहुल द्रविड, रोहित शर्मा, अजित आगरकर…

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या मुख्यालयात गेल्या आठवड्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक होती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यात आणि बैठकीचा प्रमुख विषय होता हार्दिक पांड्या! अमेरिका व वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धांसाठी भारतीय संघ निवडीबाबत मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. आयपीएलमधील हार्दिकच्या कामगिरीमुळे त्याच्या विश्वचषक संघातील समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून त्यावरच या बैठकीच चर्चा झाल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

हार्दिकनं नियमितपणे गोलंदाजी करायला हवी!

या बैठकीमध्ये हार्दिक पांड्यानं आयपीएल हंगामात नियमितपणे गोलंदाजी करायला हवी, यावर तिघांचं एकमत झाल्याचं समजतंय. हार्दिक पांड्यानं आत्तापर्यंत झालेल्या मुंबईच्या सहा सामन्यांपैकी फक्त चार सामन्यांमध्ये गोलंदाजी केली आहे. त्यात पहिल्या दोन सामन्यांनंतर मधल्या दोन सामन्यांसाठी त्यानं गोलंदाजी केलीच नाही. नंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि चेन्नई सुपर किंग्जविरोधात पंड्यानं अनुक्रमे एक आणि तीन षटके गोलंदाजी केली. या सहा सामन्यांमध्ये अवघे तीन बळी घेतले आहेत. शिवाय त्याचा इकॉनॉमी रेटही तब्बल १२ धावा प्रतीषटक इतका राहिला आहे. भारतीय संघ व्यवस्थापनासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे.

IPL 2024: मुंबईच्या पराभवानंतर सुनील गावसकर हार्दिकवर संतापले; म्हणाले, ‘मी खूप दिवसांनी इतकी वाईट…’

हार्दिक पांड्यासाठी बॅक ऑफ द लेंग्थ, सीम आणि कटर्स ही प्रमुख अस्त्रं राहिली आहेत. पण यंदाच्या आयपीएलमध्ये यातलं एकही अस्त्र त्याच्या कामी आलेलं नाही.

शिवम दुबेशी स्पर्धा?

भारतीय टी-२० संघाला सध्या एका चांगल्या ऑलराऊंडरची आवश्यकता आहे जो फलंदाजीप्रमाणेच त्याच्या वाट्याची सर्व षटकं प्रभावीपणे मारा करू शकेल. त्यामुळेच पूर्ण तंदुरुस्त आणि फॉर्ममध्ये असणारा हार्दिक पांड्या भारतीय संघाला हवा आहे. मात्र, त्याच्या आयपीएलमधील आत्तापर्यंतच्या कामगिरीमुळे निवड समिती त्याच्याऐवजी शिवम दुबेचाही विचार करत असल्याची चर्चा आहे.

हार्दिक पांड्यानं यंदाच्या आयपीएलमध्ये अवघ्या १३१ धावा केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवड समिती शिवम दुबेच्या पर्यायाचा विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे. डावखुरा शिवम दुबे समोरच्या फिरकी गोलंदाजीच्या चिंधड्या उडवू शकतो. तसेच, जलदगती गोलंदाजांच्या बाऊन्सर्सचाही आता तो यशस्वीपणे सामना करताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या वेगवान धावा संघाला मधल्या फळीत उपयुक्त ठरू शकतात. पण चेन्नई सध्या शिवम दुबेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरत असल्यामुळे त्याचा भारतीय संघाला पार्टटाईम गोलंदाज म्हणूनच वापर करता येऊ शकतो.

Team India : ‘विश्वचषकासाठी शिवम दुबेची निवड न झाल्यास CSK जबाबदार असेल..’ भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

दरम्यान, निवड समिती व संघ व्यवस्थापन अद्याप हार्दिक पांड्यासाठीच आग्रही आहे. हार्दिकमुळे फलंदाजी अधिक खालच्या क्रमापर्यंत नेता येऊ शकते. तसेच, गोलंदाजीमध्ये एक तगडा सहावा गोलंदाज संघाला उपलब्ध होऊ शकतो.

हार्दिक पांड्याची यंदाच्या IPL मधील कामगिरी

सुरुवातीची षटकं (१-६) – ४ षटकं, ४४ धावा, १ बळी, इकोनॉमी – ११
मधली षटकं (७-१६) – ६ षटकं, ६२ धावा, १ बळी, इकोनॉमी – १०.३३
शेवटची षटकं (१६-२०) – १ षटक, २६ धावा, १ बळी, इकोनॉमी – २६