Rohit Sharma: आशिया चषक २०२३ला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने कुटुंबासह तिरुपती बालाजीच्या मंदिरात दर्शन घेतले. रोहितची पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत दर्शनासाठी तेथे पोहचले. जिथे त्यांनी मोठी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मंदिरात आशीर्वाद घेतले. रोहितचा मंदिरात गेल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे. रोहितला पाहताच काही चाहत्यांनी त्याची विराट कोहलीसोबत तुलना करायला सुरुवात केली.
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली फ्लोरिडामध्ये सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज टी२० मालिकेत भारतीय संघाचा भाग नाहीत. दोन्ही खेळाडूंना आशिया कपपर्यंत विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आगामी आयसीसी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आंध्र प्रदेशातील तिरुपती शहरात पोहोचला. जिथे त्यांनी तिरुपती बालाजी मंदिरात भगवानांचे आशीर्वाद घेतले. रोहितचा त्याच्या कुटुंबासह दर्शन घेण्यासाठी गेल्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याची पत्नी आणि मुलगीसह तो मंदिराकडे जात आहे. त्याच दरम्यान त्याच्या चाहत्यांनी त्याची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे. मात्र, रोहितला पाहताच विराट कोहलीच्या चाहत्यांनीही त्याच्यावर निशाणा साधला.
सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रिया देताना चाहत्यांनी लिहिले की, “भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा माजी कर्णधार विराट कोहलीची नक्कल करत आहे. खरं तर, विराट कोहलीने त्याच्या खराब फॉर्मच्या दिवसात अनेक मंदिरांना भेट दिली होती.” दरम्यान कोहलीने नीम करोली बाबा, वृंदावन बांके बिहारी आणि उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर तो फॉर्ममध्ये परतला आणि त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकामागून एक शतके झळकावली. त्याचवेळी आता रोहितही टीम इंडियाने आशिया चषक आणि विश्वचषक जिंकण्यासाठी त्याने तिरुपती बालाजीकडे साकडे घातले. त्याचबरोबर आशिया चषकात रोहित चांगली कामगिरी अशी प्रार्थना देखील त्याने केली.
टीम इंडियाशी संबंधित प्रश्नांवर कॅप्टन मनमोकळेपणाने बोलत आहे
आशिया चषक काही दिवसांत सुरू होणार असून, त्याचप्रमाणे विश्वचषकही फार दूर नाही. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मासमोर अनेक प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले आहेत, ज्यांची हिटमॅनने मोकळेपणाने उत्तरे दिली. अलीकडेच रोहितला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाबद्दल विचारण्यात आले, “ज्यावर त्याने होकार दिला आणि सांगितले की होय, टीम इंडियामध्ये नंबर ४ वर कोणाला खेळवायचे याबाबत समस्या आहे. त्यावर लवकरच मार्ग काढला जाईल.”