Rohit Sharma react on bat selection process : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा त्याच्या सडेतोड उत्तरांसाठी ओळखला जातो. प्रश्न स्वत:बद्दल असो किंवा संघाबद्दल, रोहित नेहमीच आपले मत उघडपणे मांडतो. त्याने आता त्याच्या बॅट निवडीबाबत स्पष्ट उत्तर दिले आहे. ‘हिटमॅन’ या नावाने प्रसिद्ध असलेला रोहित म्हणतो की, त्याला त्याची बॅट निवडण्यात जास्त वेळ लागत नाही. रोहितच्या नजरेत बॅटचा बॅलन्स सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे इतर गोष्टींचा फारसा फरक पडत नाही. मात्र, त्याने ड्रेसिंग रूमबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
तो सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार कार्यक्रमात बोलताना म्हणाला, असे अनेक खेळाडू आहेत. जे बॅटच्या निवडीत छोट्या-छोट्या गोष्टी तपासतात. मात्र, यावेळी कर्णधार रोहित शर्माने कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही. भारतीय संघ सध्या दीर्घ विश्रांतीवर आहे. श्रीलंका दौरा संपल्यानंतर रोहितसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना ४३ दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. वास्तविक, रोहितला सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कारादरम्यान बॅट निवडीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
रोहित शर्मा बॅट निवडीबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना काय म्हणाला?
रोहित शर्मा बॅट निवडीबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला, “मी बॅट निवडीबाबत फारसा विचार करत नाही. संघात याकडे कमीत कमी लक्ष देणारा खेळाडू कोण असेल तर तो मीच आहे. जे माझ्यासोबत ड्रेसिंग रूममध्ये वेळ घालवतात त्यांना हे माहीत आहे. मी बॅटवर स्टिकर्स आणि टेप लावतो. माझे सहकारी खेळाडू सांगू शकतील की मी जी बॅट एकदा निवडतो, त्यानेच खेळतो. मला बॅट निवडण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. माझ्या मते बॅटचा बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. मी अनेक खेळाडू पाहिले आहेत जे अनेक गोष्टी तपासतात. बॅट किती हिरवी आहे, वजन किती आहे आणि बाहेरून कसी आहे? ते सर्व पाहतात. मी तसा खेळाडू नाही. मी फक्त एक योग्य बॅट निवडतो आणि खेळतो.”
रोहित शर्माला मिळाला हा खास पुरस्कार –
अलीकडेच, सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्समध्ये, रोहितला त्याच्या सर्व फॉरमॅटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरूषांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला. रोहितने २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८०० धावा केल्या. या काळात त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२५५ धावा केल्या. त्याच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकून ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.
त्याचवेळी माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राहुल द्रविडचा टीम इंडियासोबतचा कोचिंगचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर संपला. तसेच विराट कोहलीला सर्वोत्कृष्ट वनडे फलंदाजाचा पुरस्कार मिळाला. त्याने २-२३ मध्ये १३७७ धावा केल्या असून त्यात ६ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. टीम इंडिया आता १९ सप्टेंबरपासून ॲक्शनमध्ये दिसणार आहे. टीम इंडिया मायदेशात बांगलादेशविरुद्ध कसोटी आणि टी-२० मालिका खेळणार आहे.