IND vs PAK Highlights in marathi: विराट किंग कोहली… भारतीय संघाचा कट्टर प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानविरूद्ध विराट कोहलीची बॅट पुन्हा तळपली. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात शतक तर केलेच पण संघालाही विजय मिळवून दिला. पण विराट कोहलीचे हे शतक नाट्यमय पद्धतीने पूर्ण झाले. यामध्ये रोहित शर्माच्या एका मेसेजनंतर विराटने मोठा फटका खेळत आपले शतक पूर्ण करत संघाच्या विजयावर मोहोर उमटवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४२ व्या षटकात विराट कोहलीला शतक पूर्ण करण्यासाठी ६ धावा तर भारताला विजयासाठी पाच धावांची गरज होती. शाहीन शाह आफ्रीदीने त्याच्या षटकात अनेक वाईड चेंडू टाकत विराटच्या शतकामध्ये अडथळा आणला. पण विराट कोहली काही हटला नाही. भारताला विजयासाठी चार धावांची गरज आणि विराट कोहली ९५ धावांवर खेळत होता. पुढच्या षटकात विराटने एक धाव घेतली आणि विराट ९६ धावांवर पोहोचला, संपूर्ण स्टेडियम शांत झालं.

विराट कोहली मोठा फटका खेळत नसून एकेक धाव काढत होता, हे पाहून ड्रेसिंग रूममध्ये असलेल्या रोहित शर्माने इशारा केला आणि हात उंच वर करत त्याला इशारा करत सांगितले की, “अरे सिक्स मारून संपव ना…” रोहित शर्माच्या या प्रतिक्रियेनंतर अक्षरने पुढच्या चेंडूवर एक धाव घेत विराटला स्ट्राईक दिली. विराटने दणदणीत चौकार लगावत आपलं शतक पूर्ण केलं आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून विराट कोहलीने केवळ विजयाच मिळवून नाही दिली तर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचेल याच्यावरही शिक्का मारला. दुबईच्या मैदानावर शतक झळकावल्यानंतर तो भारतीय ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवत म्हणाला – “मी सांगितलं होत ना, मी आहे अजून इथे.”

विराट कोहली गेल्या बऱ्याच काळापासून फॉर्मशी झगडत आहे. विराटला त्याच्या खेळीचे मोठ्या खेळीत रूपांतर करता येत नव्हते आणि तो बाद व्हायचा. पण पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या चांगल्या रेकॉर्डने आशा निर्माण केल्या होत्या की हाच सामना असू शकतो ज्यामध्ये कोहलीच्या बॅटमधून शानदार खेळी पाहायला मिळेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने केलेल्या जबरदस्त सरावानेही याची आशा निर्माण केली होती, जिथे तो दुबईत त्याच्या सहकाऱ्यांसमोर ९० मिनिटं लवकर सरावासाठी पोहोचला होता. विराट कोहलीने सर्वांच्या या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही आणि त्याने मोठी खेळी करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला आणि आपलं शतकही पूर्ण केलं.