Rohit Sharma Hilarious Reaction on KL Rahul Drop Catch Video: भारताने बांगलादेशचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेला विजयाने सुरूवात केली. भारताने शुबमन गिलच्या शतकासह २२९ धावांचे लक्ष्य गाठत ६ विकेट्सने विजय मिळवला. तर मोहम्मद शमीने देखील पाच विकेट्स घेत बांगलादेशची झोप उडवली. याशिवाय भारत-बांगलादेश सामन्यात लक्षवेधी ठरलेल्या इतर गोष्टी म्हणजे सुटलेले झेल आणि धावबाद करण्याचे फेल ठरलेले प्रयत्न. दरम्यान भारताच्या डावातील रोहित शर्माचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
रोहित शर्माने बांगलादेशच्या डावात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर हॅटट्रिक असलेला झेल सोडला, ज्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. यानंतर हार्दिक पंड्याने एक झेल सोडला. तर धावबाद करण्याचे अनेक प्रयत्न फेल गेले. भारताच्या नव्हे तर बांगलादेशच्या डावातही हे पाहायला मिळालं. सीमारेषेजवळ जकिर अलीने केएल राहुलचा महत्त्वपूर्ण झेल सोडला आणि जो विकेट बांगलादेशच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. पण हा झेल सोडल्यानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
रोहित शर्माच्या या प्रतिक्रियेमागेचं कारण म्हणजे अक्षर पटेलच्या हॅटट्रिकच्या चेंडूवर रोहितने ज्याचा झेल सोडला होता, त हाच फलंदाज होता. ज्याने नंतर तौहिद ह्रदयबरोबर १५४ धावांची भागीदारी रचली आणि बांगलादेशचा डाव सावरला.
भारताच्या डावातील ३७ व्या षटकात तस्किन अहमद गोलंदाजी करत होता. तस्किनने टाकलेल्या चेंडूवर राहुलने मोठा फटका खेळला आणि हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पडणार असल्याचे चित्र दिसत होते. तिथे जकिर अली क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. चेंडू फार हवेत गेल्याने लाईटमुळे जकिरला तो चेंडू पकडता आला नाही आणि हातात चेंडू येऊनही टप्पा पाडून जमिनीवर पडला. बांगलादेशला हा सोडलेला झेल इतका महागात पडला की महत्त्वपूर्ण क्षणी त्याने ४१ धावांची नाबाद खेळी करत विजयी षटकारासह संघाला विजय मिळवून दिला.
केएल राहुल भारताच्या फलंदाजी फळीतील अखेरचा स्पेशालिस्ट फलंदाज होता, यानंतर अष्टपैलू खेळाडू फलंदाजीसाठी उतरणार होते. भारताने सलग तीन विकेट गमावल्याने संघ पेचात अडकला की काय अशी स्थिती होती. पण राहुलने गिलबरोबर डाव सावरला. जकिर झेल टिपणार हे पाहताच रोहितने डोक्याला दोन्ही हात लावले होते. पण त्याने झेल सोडल्यानंतर रोहित शर्मा ड्रेसिंग रूममधून त्याला खुणावत होता.
Rohit Sharma's reaction when KL Rahul's catch got dropped ?❤️
— Sachin chinna 11 (@sachin_chinna) February 20, 2025
#IndvsBan #RohitSharma pic.twitter.com/NujsG8Pf4Q
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) February 20, 2025
Rohit sharma be like : – mein catch chora hai…abh tum bhi catch choro??#RohitSharma #ChampionsTrophy2025 #RohitSharma? #ChampionsTrophy pic.twitter.com/PschBwPBqY
— Ravi Sharma (@RaviSharma2845) February 20, 2025
‘मी तुझा कॅच ड्रॉप केला होता, आता तू कॅच ड्रॉप केलास…’, रोहित शर्माच्या प्रतिक्रियेवरून रोहित असंच काहिसं म्हणत असल्याचं जाणवलं. तर समालोचकांनीदेखील रोहित शर्मा असंच बोलत असल्याचं मजेत म्हटलं. रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात संघाला चांगली सुरूवात करून देत रोहितने ७ चौकारांसह ४१ धावांची खेळी केली.