Rohit Sharma reaction on ODI series defeat against Sri Lanka : भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका गमावली. या मालिकेत भारताला ०-२ लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. पहिला सामना बरोबरीत सुटला आणि त्यानंतर पुढचे दोन सामने श्रीलंकेने जिंकले. या मालिकेत भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. कर्णधार रोहित शर्मा वगळता कोणीही या मालिकेत एकूण १०० धावांचा टप्पा पार करु शकले नाही. हिटमॅनने सर्वाधिक १५७ धावा केल्या. त्याच्यानंतर अक्षर पटेलने ७९ धावा केल्या. कोहलीने ५८, शुबमनने ५७ आणि वॉशिंग्टन सुंदरने ५० धावा केल्या. मालिकेतील दारुण पराभवावर रोहित शर्मा काय म्हणाला? जाणून घेऊया.

भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध २७ विकेट्स गमावल्या. असे असूनही हिटमॅनने सांगितले की, ही फार मोठी समस्या नाही. रोहित म्हणाला, “मला वाटत नाही की ही (फिरकीची समस्या) मोठी चिंतेची बाब आहे. पण ही अशी गोष्ट आहे, ज्याकडे आपण वैयक्तिकरित्या आणि गेमप्लॅन म्हणून पाहिली पाहिजे.” भारताचे फलंदाज दुनिथा वेल्लालगे, जेफ्री वँडरसे यांसारख्या फिरकी गोलंदाजांसमोर अडचणीत आलेले दिसत होते.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
amit shah slams uddhav thackeray in karad public meeting
बाळासाहेबांनी कमावलेले सर्व उद्धव ठाकरेंनी गमावले; अमित शहा यांचा हल्लाबोल
Alzarri Jospeh Banned for 2 Matches by West Indies Cricket Board For On Field Argument with WI Captain Shai Hope vs England ODI Match
अल्झारी जोसेफला रागात मैदान सोडणं पडलं भारी, क्रिकेट वेस्टइंडिजने केली मोठी कारवाई
yogendra yadav BJP Traitor Party
भाजप देशद्रोही पक्ष – योगेंद्र यादव
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

आत्मसंतुष्टत कधीच असू शकत नाही : रोहित शर्मा

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया पूर्णपणे समाधानी आहे का, असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, “हा विनोद आहे. तुम्ही भारताकडून खेळत असताना कधीही आत्मसंतुष्टत कधीच असू शकत नाही. विशेषता, जेव्हा मी कर्णधार असतो, तेव्हा असे घडण्याची शक्यता फार कमी नसते.” रोहित शर्माने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मालिकेत भाग घेतला. त्याची बॅट सतत धावा करत राहिली, पण त्याला सहकारी खेळाडूंची साथ मिळाली नाही.”

हेही वाचा – IND vs SL ODI : मालिका गमावताच रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, ‘या’ खेळाडूंच्या यादीत झाला सामील

रोहित शर्माने श्रीलंकेचे केले कौतुक –

रोहितने श्रीलंकेच्या संघाचेही कौतुक केले. तो म्हणाला, “तुम्हाला चांगल्या क्रिकेटचे श्रेय द्यावे लागेल. श्रीलंका संघाने आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले. आम्ही परिस्थिती पाहिली आणि संयोजनाने खेळलो. असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यामुळे संघात बदल करण्यात आले. या मालिकेतील सकारात्मक पैलूंऐवजी हे, आपण अनेक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कारण पुढच्या वेळी जेव्हा आपल्याला अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल, तेव्हा त्यासाठी आपण अधिक चांगल्या प्रकारे त्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.”

हेही वाचा – Vinesh Phogat Disqualified : ‘संपूर्ण देश तुमच्या पाठीशी…’, विनेश-निशासाठी पोस्ट करत सचिन तेंडुलकरही झाला भावूक, पाहा काय म्हणाला

रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद –

टीम इंडियाने मालिका गमावल्याने कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. श्रीलंकेविरुद्ध द्विपक्षीय वनडे मालिका गमावणारा तो तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर (१९९७) आणि मोहम्मद अझरुद्दीन (१९९३) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने लंकेविरुद्धची द्विपक्षीय वनडे मालिका गमावली होती. भारताने शेवटची एकदिवसीय मालिका सचिन तेंडुलकरच्या नेतृत्त्वाखाली १९९७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध गमावली होती. यानंतर २७ वर्षांनी रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताने नकोसा विक्रम केला आहे.