Rohit’s statement on Tilak Verma’s place in World Cup Team: वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघ १-२ ने पिछाडीवर आहे. या मालिकेत युवा खेळाडू तिलक वर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आपल्या फलंदाजाने सर्वांना प्रभावित केले आहे. त्यामुळे त्याला आशिया चषक आणि विश्वचषक संघात स्थान मिळावे, अशी मागणी आजी-माजी खेळाडूंकडून होत आहे. आता याबाबत कर्णधार रोहित शर्माने स्वतः तिलक वर्माबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

गुरुवारी झालेल्या ला लीगा स्पर्धेत रोहित शर्माने टीम इंडियाची विश्वचषक तयारी, नंबर 4 समस्या, सूर्यकुमार यादवचा वनडेतील फॉर्म यासह अनेक मुद्द्यांवर स्पष्ट उत्तरे दिली. पण एक असा प्रश्न होता, ज्याने रोहितलाही विचार करायला भाग पाडले. त्यावर रोहित शर्माने विश्वचषक आणि त्यापुढील काही बोलू शकत नाही, असे सांगून तो टाळताना दिसला. वास्तविक हा प्रश्न फक्त तिलक वर्माबद्दल होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या तीन डावात शानदार कामगिरी केली आहे. या संदर्भात, ला लीगा स्पर्धेत माध्यमांशी संवाद साधणाऱ्या रोहितला विचारण्यात आले की, तिलक वर्माला विश्वचषक संघात स्थान मिळेल का?

रोहित शर्माने तिलक वर्माबद्दल दिले हे उत्तर –

तिलक वर्मा बद्दलच्या प्रश्नाचे उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, मला त्याच्या फलंदाजीमध्ये तो ज्या वयात आहे, त्यापेक्षा तो अधिक परिपक्व असल्याचे दिसते. त्याला त्याची फलंदाजी चांगल्या प्रकारे माहीत आहे. मी त्याच्याशी बोलतो तेव्हा मला कळते की, त्याला फलंदाजी चांगलीच समजते. कधी फटके मारायचे आणि कोणत्या वेळी फलंदाजी कशी करायची, हे त्याला माहीत आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण सांगितले की, तो खूप शानदार आणि आश्वासक वाटला. शेवटी, भारतीय कर्णधार म्हणाला की, मला एवढेच सांगायचे आहे. मला विश्वचषक वगैरे माहिती नाही. पण तो खूप हुशार आहे आणि त्याने काही डावांतच हे दाखवून दिले आहे.

हेही वाचा – Rohit Sharma : विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारताच रोहित शर्मा संतापला; म्हणाला, “तुम्ही जडेजाबद्दल…”

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघात तिलक वर्माची निवड –

आता तिलक वर्माच्या संधींबद्दल बोलायचे, तर सर्वप्रथम त्याची आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघात निवड झाली आहे. या स्पर्धेच्या आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या सुरुवातीच्या तारखा एकमेकांशी भिडत आहेत. अशा स्थितीत या संघातील खेळाडू विश्वचषकातून पूर्णपणे बाहेर असल्याचे मानले जात आहे, मात्र तिलकची यांची कामगिरी लक्षात घेऊन बीसीसीआयने मध्यंतरी काही योजना आखल्यास संघात बदल केले जाऊ शकतात.

हेही वाचा – Rohit Sharma: दुखापतग्रस्त खेळाडूंच्या पुनरागमनाबाबत रोहित शर्माची भूमिका स्पष्ट; म्हणाला, “त्यांना माहित आहे की ते…”

विशेष बाब म्हणजे तिलक वर्मा हा डावखुरा फलंदाज असून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो.तो डावही हाताळू शकतो आणि गीअर्स बदलण्यातही तो पटाईत आहे. त्याने टीम इंडियाला युवराज सिंगच्या फलंदाजीची आठवण करून दिली. युवराजनंतर पासून टीम इंडिया सुद्धा नंबर ४ च्या समस्येशी झुंजत आहे, रोहित शर्माने देखील हे मान्य केले आहे. अशा स्थितीत तिलकला प्रथम आशिया चषक आणि नंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळाले, तर तो खूप मनोरंजक आणि मोठा निर्णय ठरू शकतो.