Did Rohit Sharma Really Forgot Trophy After Press Conference: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने इतिहास घडवला आहे. भारतीय क्रिकेट संघ तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले. यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने स्पर्धेच्या ट्रॉफीसह पत्रकार परिषद घेतली. मात्र पत्रकार परिषद झाल्यानंतर रोहित शर्मा ट्रॉफी विसरल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

या आयसीसी स्पर्धेत भारताचा दबदबा इतका होता की त्यांनी एकही सामना न गमावता ट्रॉफी आपल्या नावे केली. भारताने गट टप्प्यात बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. दरम्यान, भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित शर्माने जिंकलेली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी तो टेबलवरच विसरला.

संपूर्ण पत्रकार परिषदेचा व्हिडिओ नीट पाहिल्यास वेगळीच गोष्ट समोर येते. टीम इंडियाचा सहकारी रोहित शर्मा उठताच ट्रॉफी घेण्यासाठी सरसावतो आणि त्यांनी रोहितला दुबईमध्ये पत्रकारांसमोर फोटो काढण्याची विनंती केली होती. यानुसार रोहित शर्मा ट्रॉफी विसरला नसल्याचेही म्हटले जात आहे. यादरम्यान रोहित शर्माने पत्रकार परिषदेत रोहित शर्माने त्याच्या निवृत्तीच्या अफवांवर पूर्णविराम लावला.

रोहित शर्मा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो, अशी चर्चा जोर धरून होती, परंतु भारतीय कर्णधाराने सर्व अफवांना पूर्णविराम दिला. रोहित पत्रकार परिषदेत म्हणाला, “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त होत नाहीये, मी हे सांगतोय कारण पुन्हा कोणत्याही अफवा पसरवल्या जाऊ नयेत.”

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या विजयानंतर भारतीय संघ मायदेशात परतला आहे. यानंतर टीम इंडियाचे सर्व स्टार खेळाडू आयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसणार आहेत. आयपीएलचा १८वा सीझन येत्या २२ मार्चपासून सुरू होत आहे. पहिलाच सामना आरसीबी वि. केकेआर यांच्यात होणार आहे.

Story img Loader