२४ सप्टेंबर २००७, ही तारीख भारत आणि भारतीय चाहत्यांसाठी खूप खास आहे, कारण या दिवशी महेंद्रसिंह धोनीच्या युवा संघाने पाकिस्तानला अंतिम फेरीत पराभूत करून प्रथमच टी-२० विश्वचषक जिंकला. पाकिस्तान विरुद्ध टी-२० विश्वचषकाची अंतिम लढत अतिशय रोमांचक होती, जिथे शेवटी भारत विजयी झाला. आजपासून १४ वर्षांपूर्वी झालेल्या या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट पूर्णपणे बदलले आणि धोनी युग सुरू झाले. पहिल्यांदाच झालेल्या या विश्वचषकात स्फोटक फलंदाज रोहित शर्माही खेळला. हा ऐतिहासिक क्षण आठवून त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

त्याने या स्पर्धेचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जिथे तो २००७ च्या टी-२० विश्वचषक विजयाचा आनंद त्याच्या सहकारी खेळाडूंसोबत साजरा करताना दिसत आहे. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘२४ सप्टेंबर २००७, जोहान्सबर्ग. ज्या दिवशी करोडो लोकांचे स्वप्न पूर्ण झाले. त्यावेळी कोणीही विचार केला नसेल, की आमच्यासारखा एक अननुभवी युवा संघ इतिहास घडवेल. त्या क्षणाला १४ वर्षे झाली. तेव्हापासून आपण खूप पुढे आलो आहोत. या काळात आपण अनेकवेळा इतिहास रचला आहे, तसेच आम्हालाही धक्का बसला आहे.”

त्यांनी पुढे लिहिले, ”आम्ही खूप लढा दिला, पण यामुळे आमचा आम्ही कचरलो नाही, कारण आम्ही कधीही हार मानत नाही. आम्ही आमचे सर्वस्व दिले आहे. पुढील महिन्यात होणारा टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी आणि पुन्हा इतिहास घडवण्यासाठी आम्ही सर्व काही पणाला लावणार आहोत आहोत. आम्ही येत आहोत आणि ही वर्ल्डकप ट्रॉफी आमची आहे. चला या गोष्टीला सत्यात उतरवू.”

हेही वाचा – T20 World Cup : पाकिस्तानला ‘जबर’ धक्का! भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘दिग्गज’ खेळाडूला झाला डेंग्यू

सध्या, सर्व भारतीय खेळाडू यूएईमध्ये आयोजित आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात व्यस्त आहेत. आयपीएल २०२१ संपल्यानंतर एक दिवसानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होईल. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ओमानमध्ये ही स्पर्धा होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही स्पर्धा आयोजित करत आहे.

Story img Loader