IND vs AUS BCCI on Rohit Sharma Test Retirement : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४ मध्ये रोहित शर्मा आतापर्यंत खराब फॉर्ममध्ये दिसला आहे. मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय कर्णधार केवळ ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या रोहितच्या निवृत्तीची बरीच चर्चा आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याचे अनेक दावे सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहेत. आता भारतीय कर्णधाराच्या निवृत्तीवर बीसीसीआयने मौन सोडले आहे.

बीसीसीायची रोहित शर्माबद्दल प्रतिक्रिया –

रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “रोहितसोबत निवृत्तीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. सर्व निराधार अफवा आहेत आणि आम्ही अफवांवर भाष्य करत नाही. अशा अफवा ऐकण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो कठीण काळातून जात आहे पण त्याने निवृत्ती घ्यायची की नाही हे त्याच्यावर अवलंबून आहे. आम्ही रोहितकडून याबद्दल काहीही ऐकले नाही. आम्ही कसोटी सामन्याच्या मध्यावर आहोत आणि आमचे लक्ष ते जिंकण्यावर आहे.”

suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Rishabh Pants bizarre dismissal at MCG leaves Sunil Gavaskar fuming
IND vs AUS : ‘मूर्खपणाची एक मर्यादा असते…’, ऋषभ पंतच्या खराब शॉटवर सुनील गावस्करांची संतप्त प्रतिक्रिया
Corbin Bosch smashed highest score at number 9 in test cricket history against pakistan match
SA vs PAK : दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने केला कहर! पदार्पणातच ‘हा’ विश्वविक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
Nitish Kumar Reddy Maiden Test Century in IND vs AUS Melbourne Test
IND vs AUS: नितीश रेड्डीचं पहिलं कसोटी शतक! ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर एकटा उभा ठाकला; वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले

रोहित शर्माचा खराब फॉर्म कायम –

रोहित शर्मा बराच काळ खराब फॉर्ममधून जात आहे. त्याच्या शेवटच्या १० कसोटी डावांवर नजर टाकली, तर त्यात फक्त एकच अर्धशतक दिसून येते. मागील १० कसोटी डावांमध्ये रोहितने अनुक्रमे ३, १०, ६, ३, ११, १८, ८, ०, ५२ आणि २ धावा केल्या आहेत. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात रोहित केवळ ३ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय

u

रोहित शर्माची कसोटी कारकीर्द –

रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ६६ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ११४ डावांमध्ये त्याने ४१.२४ च्या सरासरीने ४२८९ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने १२ शतके आणि १८ अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या २१२ धावा आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रोहितने २०१३ मध्ये कसोटी पदार्पण केले होते.

Story img Loader