India vs Australia 2023 2nd ODI Match Updates in Marathi : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १७ मार्चपासून सुरु झालीय. पहिल्या सामन्यात भारताने विजय संपादन केल्यानंतर विशाखापट्टणममध्ये या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याचदरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माने आगामी होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची रणनिती काय असणार, यावर भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्ल्डकप २०२३ साठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनबद्दल रोहितने मोठं विधान केलं. आजच्या सामन्यात तीन फिरकीपटूंना खेळवण्यात आलंय, यावर रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली. वर्ल्डकपच्या अनुषंगाने प्लेईंग इलेव्हनमध्ये तीन फिरकीपटू खेळवण्याच काय परिणाम होतो, याबाब आम्ही निरिक्षण करत आहोत. वर्ल्डकपमध्ये रणनिती आखण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे, असं रोहित शर्मा म्हणाला.

नक्की वाचा – IND vs AUS 2nd ODI: भारत-ऑस्ट्रेलिया आमने-सामने; दुसऱ्या सामन्यात २ विक्रम मोडणार? या फलंदाजांना इतिहास रचण्याची संधी

नाणेफेक करताना रोहित शर्मा काय म्हणाला?

“खेळपट्टी काही वेळेपासून झाकलेली आहे. आम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. आम्ही किती धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतो, हे पाहावं लागेल. तुम्ही भारतासाठी खेळता, त्यामुळे प्रत्येक सामन्यात दबाव असतो. त्यामुळे तुम्हाला शांत राहावं लागतं आणि योग्य निर्णय घ्यावा लागतो. मागच्या काही वनडे सीरिजमध्ये आम्ही शांत राहण्याचा प्रयत्न केला आहे. प्लेईंग ११ मध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. इशान या सामन्यात खेळणार नाही. मी त्याच्या जागेवर पुनरागमन केलं आहे. आजच्या सामन्यात शार्दूलच्या जागेवर अक्षर खेळत आहे. जर आम्ही नाणेफेक जिंकली, तर तीन फिरकीपटूंसोबत आम्ही मैदानात उतरणार. आम्ही वर्ल्डकपमध्येही प्लेईंग ११ मध्ये तीन फिरकीपटूंचा समावेश करू शकतो. त्यामुळे आम्ही हा प्रयोग या सामन्यात करत आहोत.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma reveals team india strategy for worldcup 2023 indian cricket team playing xi for upcoming worldcup nss