मैदानात चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणारा रोहित शर्मा ‘हिटमॅन’ नावाने प्रसिद्ध आहे. मात्र भारतीय संघाच्या वन-डे उप-कर्णधाराला ‘हिटमॅन’ हे नाव कसं पडलं माहिती आहे? खुद्द रोहित शर्माने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
अवश्य वाचा – Blog: देशातले शेर, परदेशात सव्वाशेर ठरतील?
२०१३ साली ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर होता. यावेळी बंगळुरुच्या मैदानात वन-डे सामन्यादरम्यान रोहित शर्माने आपलं पहिलं वहिलं द्विशतक झळकावलं. यावेळी आमचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे समालोचन होतं. त्यावेळी त्यांच्या टेक्निकल टीमध्ये पीडी नावाचा एक व्यक्ती होता. त्याने समालोचन कक्षात येऊन, भारताने संघात हिटमॅनला जागा दिली आहे का असं गमतीने एक वक्तव्य केलं होतं. त्यावेळी रवी शास्त्रींच्या कानावर हा शब्द पडला आणि त्यापासूनच मला ‘हिटमॅन’ हे नाव पडलं.
अवश्य वाचा – ……तर सरळ जेलमध्ये टाकेन! पोलिसांचा रोहित शर्माला सज्जड दम
श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देऊन, बीसीसीआयने रोहित शर्माला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. यावेळी रोहितने भारतीय संघाचं नेतृत्व करत वन-डे मालिकेत भारताला २-१ तर टी-२० मालिकेत ३-० असा विजय मिळवून दिला. टी-२० मालिकेत सलामीला येणाऱ्या रोहित शर्माने एक झुंजार शतकही झळकावलं. ५ जानेवारीपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेत रोहितची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी राहिलेली नाहीये. त्यामुळे घरच्या मैदानावरील चांगल्या फॉर्मचा त्याला दक्षिण आफ्रिकेत काही फायदा होता का हे पहावं लागेल.