Rohit Sharma and Ritika Sajdeh Blessed with Baby Boy: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्याची पत्नी रितिका सजदेहने एका मुलाला जन्म दिला आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सोशल मीडियावर रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाल्याच्या पोस्टने एकच धुमाकूळ घातला आहे. चाहते रोहितला यासाठी शुभेच्छा देत आहेत. पण रोहित शर्मा किंवा त्याची पत्नी रितिका सजदेह यांनी याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिलेली नाही. रितिकाने शुक्रवारी, १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला, असं हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं जात आहे. मुलाच्या जन्मामुळे रोहित शर्मा कसोटी मालिकेसाठी टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला गेला नाही, यावरही चर्चा सुरू होती. मात्र मुलाच्या जन्मानंतर तो ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी

Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ajit Pawar Sharad Pawar Meet in Delhi
Ajit Pawar Sharad Pawar Meet: अजित पवारांची प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांशी भेट; कशावर झाली चर्चा? उत्तरादाखल म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार…”
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
father son emotional video
“जेव्हा प्रेम आणि कर्तव्य दोन्ही समोर असतात”, मुंबईतील रेल्वेस्थानकावरील ‘हा’ VIDEO पाहून कळेल बापाची माया काय असते

रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह प्रेग्नेंट असल्याने रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरूद्धची पहिली कसोटी खेळणार नाही, असं रिपोर्ट्समध्ये समोर आलं होतं. तर रोहितने बीसीसीआयला खाजगी कारणामुळे कसोटीसाठी उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले होते. पण संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होत असताना रोहित शर्मा जाणार की नाही याबाबत बोर्डाकडून कोणतीही स्पष्टता नव्हती. आता रोहित शर्मा बाबा झाला असल्याची चर्चा सुरू झाल्याने या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यापासून तो ऑस्ट्रेलियाला रवाना होईल आणि भारताचे नेतृत्त्व करेल असे म्हटले जात आहे. जर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला गेला तर भारताकडून सलामीसाठी कण उतरणार हा मुद्दा मार्गी लागेल. या संदर्भात टीम इंडिया चिंतेत आहे. भारताचा पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून आहे.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy 2024 Schedule: भारतीय वेळेनुसार बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं कसं असणार वेळापत्रक? पहाटे किती वाजता सुरू होणार सामना?

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांना समायरा नावाचा एक गोड मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून रितिका सजदेह प्रेग्नेंन्ट असल्याचे फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर आता रितिकाने मुलाला जन्म दिल्याची चर्चा सुरू आहे. रोहित शर्मा आणि रितिकाकडून याबाबत ऑफिशियल कधी सांगितलं जाईल याकडे चाहत्यांच्या नजरा आहेत. एक्सवर तर ‘ज्युनियर हिटमॅन’ असा ट्रेंडदेखील सुरू आहे.

Story img Loader