IND vs SL 2nd ODI Match Updates: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून दुसरा एकदिवसीय सामना आज ४ ऑगस्टला खेळत आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारताला २४१ धावांचे आव्हान दिले आहे. भारत प्रथम गोलंदाजी करत असताना रोहित शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यातील एक व्हीडिओ सध्या समोर आला आहे. सुंदर गोलंदाजी करत असताना दोन वेळा थांबला, हे पाहून रोहित शर्मा सुंदरला मारण्यासाठी पुढे येताना दिसला. हा व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 9: नोवाक जोकोविचने सुवर्णपदक मिळवत घेतला बदला, अल्काराजचा 2-0 ने दणदणीत पराभव
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावरील त्याच्या मजेशीर वागण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या सामन्यात त्याचा आवाज स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला होता. ज्यामध्ये तो वॉशिंग्टन सुंदरला म्हणताना दिसत होता – तू माझ्याकडे काय पाहतोय? आता रोहित शर्मा पुन्हा एकदा त्याच सुंदरला मारण्यासाठी धावला. मात्र, त्याने हे रागात नाही तर चेष्टेने केले. रोहितचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या एका चुकीवर सुंदरला मारायला धावत आहे.
Rohit Sharma लाइव्ह सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला मारण्यासाठी का धावला?
फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर जेव्हा गोलंदाजीला आला तेव्हा तो एकदा नव्हे तर दोनदा गोलंदाजीच्या ॲक्शनमध्ये अडकला. जेव्हा तो दुसऱ्यांदा अडकला, तेव्हा स्लिपमध्ये उभा असलेला कर्णधार रोहित शर्मा वॉशिंग्टन सुंदरला मारण्यासाठी मजेशीर पद्धतीने धावत येत होता. जेव्हा तो धावत येत होता, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. मात्र, तो काही पावलं धावला आणि परत आपल्या जागेवर परतला. हा संपूर्ण प्रकार पाहून विकेटकीपर केएल राहुलही हसायला लागला.
अनुभवी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याच्या १० षटकांच्या स्पेलमध्ये, त्याने केवळ ३ च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली आणि ३० धावांत ३ विकेट घेतले आणि १ मेडन ओव्हर देखील टाकली. सुंदरने अविष्का फर्नांडो, चारिथ असलंका आणि कुसल मेंडिस यांना बाद केले.
दुसऱ्या वनडेत श्रीलंकेने भारतासमोर २४१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेने ५० षटकांत ९ गडी गमावून २४० धावा केल्या. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो आणि कामिंदू मेंडिस यांनी सर्वाधिक ४० धावा केल्या. याशिवाय दुनिथ वेलालगेने ३९ धावा केल्या. कुसल मेंडिसनेही ३० धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३ विकेट घेतले. कुलदीप यादवलाही २ विकेट मिळाले. याशिवाय अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी १-१ विकेट घेतली.