Rohit Sharma Reveals About His Team’s Preparations: लंडनमधील ओव्हल मैदानावर ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया सामन्यापूर्वी तयारीमध्ये व्यस्त आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या तयारीबद्दल खुलेपणाने सांगितले. रोहितने सांगितले की हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाचा एकच प्लान आहे. कठोर परिश्रम करणे आणि योग्य वेळी गोलंदाजांवर हल्ला करणे.

ओव्हलवर हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज राहावे लागेल –

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी ब्रॉडकास्टरने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, भारतीय कर्णधार म्हणाला की ओव्हलमध्ये फलंदाजीची सर्वोत्तम परिस्थिती आहे. रोहित शर्मा म्हणाला, ‘हवामान सतत बदलत असते, त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ लक्ष केंद्रित करावे लागेल आणि तेच या फॉरमॅटचे आव्हान आहे आणि त्यासाठी तुम्हाला तयार राहावे लागेल.”

धावा काढण्याचा पॅटर्न समजून घ्यावा लागेल –

रोहित शर्मा पुढे म्हणाला, “तुमची ताकद काय आहे, हे तुम्हाला समजले पाहिजे. येथे धावा काढण्याची पद्धत जाणून घेणे चांगले आहे. कारण आम्हाला माहित आहे की, ही इंग्लंडमधील फलंदाजीसाठी सर्वोत्तम विकेट्सपैकी एक आहे. चौरस सीमा खूप वेगवान आहेत.” सत्राचे नियंत्रक हर्षा भोगले यांनी भारतीय कर्णधाराला सर्वसाधारणपणे कसोटी क्रिकेटचे मूल्यांकन कसे केले, असे विचारले. यावर रोहित म्हणाला की, “ते आमच्यासाठी सर्वात टॉपवर आहे.”

हेही वाचा – IND vs AUS: “भविष्यात खेळाडूंना फ्रेंचायझी क्रिकेटपेक्षा राष्ट्रीय संघाचे…”, डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी पॅट कमिन्सचे आयपीएलबाबत मोठं वक्तव्य

रोहित शर्मा म्हणाला की, “हा सर्वात आव्हानात्मक फॉरमॅट आहे. हे तुम्हाला एक खेळाडू आणि एक लीडर म्हणून आव्हान देते. आमच्या टीमसाठीही तुम्हाला माहीत आहे की गेल्या तीन-चार वर्षांत आम्हाला जगभरात चांगले यश मिळाले आहे.”

आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार असले पाहिजे –

‘आफ्टरनून विथ टेस्ट लीजेंड्स’ या आयसीसी शोमध्ये रोहित म्हणाला, “मला वाटते की इंग्लंडमध्ये फलंदाजांसाठी खूप आव्हानात्मक परिस्थिती असते. जोपर्यंत तुम्ही आव्हानांना सामोरे जाण्यास तयार असाल, तोपर्यंत तुम्हाला यश मिळते.”

हेही वाचा – WTC Final 2023: सुनील गावसकरांनी निवडली टीम इंडियाची बेस्ट प्लेइंग इलेव्हन, ‘या’ खेळाडूंना दिले स्थान

आपल्या वैयक्तिक अनुभवाबद्दल बोलताना भारतीय कर्णधार म्हणाला, “मला २०२१ मध्ये एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे तुम्ही कधीही क्रीजवर सेट होत नाही आणि नंतर हवामान बदलत राहते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला क्रीजवर जाऊन तुमची ताकद काय आहे हे समजून घ्यायला हवे.”