Abhishek Nair tells the important turning point in Rohit Sharma’s life : रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आणि नंतर अशी दोन भागात विभागली जाऊ शकते. २००७ ते २०१३ च्या सुरुवातीपर्यंत, रोहित हा एक उदयोन्मुख तरुण खेळाडू होता, जो कायम संघात राहिलं, असे मानले जात होते. परंतु त्याला बाजूला केले गेले आणि भारताच्या २०११ विश्वचषकातून बाहेर करण्यात आले. अर्थात, उर्वरित अर्धा भाग २०१३ पासून आत्तापर्यंतचा कालावधी कव्हर करतो, ज्या दरम्यान भारतीय आणि जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होण्यासाठी सलामीवीर म्हणून बढती मिळाल्यानंतर रोहितची कारकीर्द नव्याने सुरू झाली.
अभिषेक नायरने सांगितली रोहितची ती गोष्ट-
आता तो भारतीय संघासाठी तीन एकदिवसीय द्विशतकं झळकावणारा एकमेव फलंदाज आहे. त्याचचबरोबर मुंबई इंडियन्सला विक्रमी पाच आयपीएल विजेतेपद मिळवून देणारा रोहित आता भारतीय संघाचा कर्णधार आणि आधुनिक काळातील महान फलंदाजांपैकी एक आहे.तथापि, हे सर्व यश रोहितच्या संघर्षाशिवाय आणि त्याने नियमितपणे तोंड देत दिलेल्या आव्हानांशिवाय मिळालेले नाही. रोहितसह अनेक माजी आणि सध्याच्या क्रिकेटपटूंनी विश्वचषक संघातून वगळले जाणे, हे रोहितसाठी अनेक मार्गांनी वेक अप कॉल असल्याचे निदर्शनास आले. आता त्याच्या जवळच्या विश्वासूंपैकी एक, सध्याचा केकेआर संघाचा सहायक प्रशिक्षक अभिषेक नायरने रोहितला त्याच्या कारकिर्दीत बदल करण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी गोष्ट सांगितली आहे.
अभिषेक नायरने यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाला त्याच्या टीआरएस क्लिप शोमध्ये सांगितले की, “जेव्हा २०११ च्या विश्वचषकासाठी रोहितची निवड झाली नव्हती, तेव्हा मी त्याला नेहमी म्हणायचो ‘चल मेहनत करूया’. कारण त्यावेळी त्याचे वजन थोडे वाढले होते. एक सीन, एक जाहिरात प्रसारित झाली होती. ज्यामध्ये रोहित आणि युवराज उभे होते आणि रोहितच्या पोटाभोवती एक वर्तुळ होते. ज्यात एक बाण दाखवत होता. मी ते कधीच विसरणार नाही. आम्ही घरीच होतो, टीव्ही पाहत होतो. त्यावेळी ही दृश्य पाहून रोहित म्हणाला की मला लोकांची ती धारणा बदलावी लागेल.”
रोहितचे वेदनादायक ट्वीट –
हे विसरू नका की तोपर्यंत रोहित विश्वचषक विजेता बनला होता आणि सीबी मालिकेच्या पहिल्या अंतिम सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. ज्यामध्ये सचिन तेंडुलकरच्या शतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर पराभूत करून ट्रॉफी उंचावण्यास मदत केली होती. २०११ मध्ये, रोहितचे नाव विश्वचषकासाठी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघात नव्हते, तेव्हा रोहितचे वेदनादायक ट्विट त्याच्या अत्यंत कट्टक चाहत्यांच्या स्मरणात आहे. कारण त्यावेळी निराशा बाजूला ठेवून रोहितच्या मनात वनवा पेटला.
रोहितने अनेक लोकांची मतं बदलली –
अभिषेक नायर पुढे म्हणाला, “काही दिवसांनंतर विश्वचषक संघाची घोषणा करण्यात आली, परंतु तो संघाचा भाग नव्हता. त्यावेळी रोहित शर्मा हिटमॅन बनला. कारण सर्व काही बदलले. त्याचा दृष्टिकोन आणि त्याचे करिअर कसे पुढे घेऊन जायचे, हे देखील बदलले होते. तो पहिला असा व्यक्ती होता, ज्या व्यक्तीसोबत माझा तो पहिलाच दौरा होता. जो एक यशस्वी क्रिकेटर म्हणून उदयास आला आणि त्याने अनेक लोकांची मतं बदलली.”
दोन मिनिटांचा मॅगीमॅन –
केकेआरचा कोच पुढे म्हणाला, “त्यावेळी लोकं त्याच्याबद्दल खूप काही सांगायची. ज्यामध्ये दोन मिनिटांचा मॅगीमॅन अशा प्रकारच्या गोष्टी होत्या. त्यामुळे सगळंच बदलून गेलं. त्याने मला सांगितलं की, ‘तू जे सांगशील ते करेन’. पण जेव्हा आयपीएल संपेल तेव्हा लोकांनी ‘तो तोच रोहित शर्मा नाही, तर तो दुसरा कोणीतरी आहे’, असं म्हणायला हवं.” त्यानंतर रोहित शर्माने आयपीएल २०१२ आणि २०१३ मध्ये अनुक्रमे ४३३ आणि ५२८ धावा केल्या. ज्या रोहितच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला.