माणसाने समाधानी असावे, पण संतुष्ट असू नये, असे म्हटले जाते. दुसरे द्विशतक झळकावणाऱ्या रोहित शर्माच्या बाबतीत असेच काहीसे म्हणता येईल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसरे द्विशतक झळकावण्याचा पराक्रम रोहितने केला. या कामगिरीने तो समाधानी असला तरी संतुष्ट मात्र नाही. देदीप्यमान कामगिरीनंतरही कारकिर्दीमध्ये मला अजून बरेच काही मिळवायचे आहे, असे रोहितने सामन्यानंतर सांगितले.
‘‘जेव्हा माझे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे लक्ष्य होते, तेव्हा माझ्याकडून अशी ऐतिहासिक कामगिरी होईल, असे मला वाटले नव्हते. सध्याच्या घडीलाही अजून बरेच काही मला मिळवायचे आहे, असे वाटते. विक्रम हे होतच असतात, पण मला अजूनही फलंदाजीवर अधिक मेहनत घेण्याची गरज आहे,’’ असे रोहित म्हणाला.

Story img Loader