IND vs SL at Mumbai Wankhede Today: गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३ ही रोहित शर्माच्या कारकिर्दीतील महत्त्वाची तारीख ठरणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय कर्णधार मेन इन ब्लूचे नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा प्रमाणेच टीम इंडियासाठी सुद्धा आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण २०११ मध्ये विश्वचषकाच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला याच मैदानावर मात देऊन विश्वचषक आपल्या नावे केला होता. आज १३ वर्षांनी पुन्हा भारत विरुद्ध श्रीलंका विश्वचषकातील महत्त्वाच्या टप्प्यावर एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. विश्वचषकाच्या मोहिमेत अपराजित ठरलेली टीम इंडिया आता सेमी फायनलमध्ये आपले स्थान निश्चित करण्यापासून थोडीच दूर आहे. आज जर भारताने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला तर भारताला आपला सलग सातवा विजय गवसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतासाठी आजचा सामना सगळं काही देऊन जाणारा असला तरी एक लहानशी चूक सुद्धा किती अंगाशी येऊ शकते याची रोहित शर्माला पूर्ण माहिती आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याच्या आधी पत्रकारांशी बोलताना रोहितने हीच भीती बोलून दाखवली आहे. रोहित शर्मा म्हणाला की, “जेव्हा गोष्टी चांगल्या असतात तेव्हा सगळ्यांचं कौतुक होत असतं, सगळ्यांना सगळं बेस्ट वाटतं पण मला माहित आहे की हे कौतुक विजयापुरतेच मर्यादित आहे. एखाद्या सामन्यातही इकडे तिकडे काही चुका झाल्या तर मी लगेचच सर्वात वाईट कर्णधार ठरेन.संघासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं मी करण्याचा प्रयत्न करेन.”

भारताने विश्वचषकात एकही पाऊल चुकीचे ठेवलेले नाही. प्रथम गोलंदाजी असो किंवा फलंदाजी भारत विजयीच ठरला आहे. पण लॉ ऑफ एव्हरेज नावाचा एक प्रकार असतो जो प्रत्येक संघाला मोठ्या स्पर्धेत किमान एकदा तरी खूप नुकसान देऊन जातो. भारताला आता श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध तीन गट सामने खेळायचे आहेत.

भारत अजूनही अपराजित राहून उपांत्य फेरीत पोहोचेल का याविसषयी रोहित शर्मा म्हणतो की, “प्रामाणिकपणे, इतक्या पुढचा विचार आम्ही करत नाही. आम्हाला फक्त प्रत्येक सामना जिंकायचा आहे. मी हे अनेकवेळा सांगितले आहे की, आमच्यासाठी आम्ही खेळत असलेला प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. त्यात आम्ही चांगले कसे खेळतो, आधीच्या सामन्यातील चुका कशा सुधारतो, हे महत्त्वाचे आहे. आम्हाला अपराजित राहायचे आहे पण मला ते आमचं ध्येय वाटत नाही. प्रत्येक गेम चांगला खेळणे हे आमचे ध्येय आहे.”

हे ही वाचा<< भारताच्या मदतीने पाकिस्तान विश्वचषक उपांत्य फेरीत? IND vs SL सामन्यानंतर अशी बदलतील गणितं

शर्मा पुढे म्हणाला की, “मला खात्री आहे की, संघातील १५ ही खेळाडू जेव्हा भारतात प्रवास करत असतील, मग ते सामने खेळत असो किंवा नसो, लोकं त्यांना खेळाविषयी आपल्या अपेक्षा सांगत असणार, आम्हाला शतक हवे आहे. आम्हाला तुम्ही पाच विकेट्स घेताना बघायच्या आहेत. आम्हाला तुम्हाला खेळ, स्पर्धा, मालिका’ हे सर्व जिंकताना पाहायचे आहे, असं म्हणत असणार. या सगळ्याचं दडपण नसलं तरी आम्हाला जाणीव आहे की लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही खेळत असलेल्या प्रत्येक सामन्याचा आनंद घेऊन शक्य तितक्या सगळ्या प्रयत्नानांनी अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma says he will be bad captain after ind vs sl match today if anything goes here there india ticket to semi finals svs
Show comments