Rohit Sharma’s Reaction to BCCI’s Scheme : भारत आणि इंग्लंड यांच्यातील धरमशाला कसोटी सामन्यानंतर बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. भारताच्या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कसोटी सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव होणार आहे. बीसीसीआयची ही घोषणा कालपासून चर्चेत आहे. यावर आता रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयच्या प्रोत्साहन योजनेबाबत त्याने ट्विट केले आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने ट्विटरवर बीसीसीआय सचिव जय शाह आणि बीसीसीआयला टॅग करताना ही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, ‘कसोटी क्रिकेट हे अंतिम स्वरूप होते आणि कायम राहील. कसोटी क्रिकेटला चालना मिळत आहे, हे पाहून मला खूप बरे वाटत आहे.’ तो पुढे म्हणाला की, कसोटी क्रिकेटला प्राधान्य दिले जात आहे, ही चांगली गोष्ट आहे.
टी-२० आणि आयपीएलने चाहत्यांना रोमांचक सामन्याची सवय लावली आहे. त्यामुळे चाहत्यांना असे सामने पाहायला आवडतात, ज्यात भरपूर धावा केल्या जातात. ज्या सामन्यांमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतो. आयपीएल सुरू झाल्यानंतर चाहत्यांमध्ये ही मागणी वाढू लागली आहे. या कारणास्तव, आयपीएलच्या धर्तीवर जगभरात डझनभर लीग खेळल्या जाऊ लागल्या आहेत. एवढे सगळे असतानाही बीसीसीआयने कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून, रोहित शर्माने त्याचे कौतुक केले आहे.
बीसीसीआयच्या या घोषणेमुळे कसोटी क्रिकेट खेळणारे खेळाडू एक सामना खेळून चार पट पैसे कमवू शकतात. बीसीसीआयच्या या घोषणे त्या खेळाडूंनाही धडा शिकवण्याचे काम केले, जे कोणत्या ना कोणत्या कारणाने देशांतर्गत क्रिकेट खेळत होते. आता असे खेळाडू भारतीय संघात खेळण्यासाठी भरपूर देशांतर्गत क्रिकेट खेळतानाही दिसतील.
हेही वाचा – Team India : भारतीय संघाने रचला इतिहास, ‘ICC’च्या तिन्ही फॉरमॅटच्या क्रमवारीसह ‘WTC’मध्येही ठरला नंबर वन!
जेणेकरून त्यांची भारतीय संघात निवड व्हावी आणि बीसीसीआयच्या कसोटी प्रोत्साहन योजनेचा लाभ घेता येईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना आयपीएल खेळण्यासाठी विश्रांती घेऊ वाटते, त्यामुळे ते कसोटी क्रिकेट खेळत नाहीत. बीसीसीआयच्या या योजनेमुळे अशा खेळाडूंना धक्का बसला आहे.