भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरातील पहिल्या कसोटीत शतक झळकावून इतिहास रचला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७१ चेंडूत हे शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १४ चौकार आणि २ गगनचुंबी षटकार निघाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील हे ९वे आणि घरच्या मैदानावरील ८वे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले शतक आहे. रोहित शर्मापूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते, परंतु त्याच्या कार्यकाळात त्यांना सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आले नाही.

रोहित शर्माचे हे शतक अत्यंत कठीण परिस्थितीत आले. भारतीय फलंदाज एकाबाजूने मैदानात येत-जात असताना, रोहितने एक बाजू सांभाळून धरली. रोहितने ६३व्या षटकात मर्फीला कव्हर्सवरुन चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. रोहितच्या या झुंजार शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावरही आघाडी मिळवली.

रोहित शर्मा ठरला जगातील चौथा फलंदाज –

रोहित शर्माने कर्णधार म्हणून न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये शतके झळकावली आहेत, तर टी-२० मध्ये त्याने श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दोनदा हा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा पराक्रम श्रीलंकेचे माजी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान, फाफ डुप्लेसिस आणि बाबर आझम यांनी केला आहे.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: केएल राहुलच्या संथ खेळीबद्दल आकाश चोप्राने व्यक्त केला संताप; प्रश्न उपस्थित करताना म्हणाला, ‘त्याला भीती आहे की…’

या शतकासह, सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत रोहित चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचा मागे टाकले. रोहितकडे आता एकूण ४३ आंतरराष्ट्रीय शतके आहेत. या यादीत विराट कोहली ७४ शतकांसह अव्वल स्थानावर आहे.

सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारे खेळाडू –

१) विराट कोहली – ७४
२) डेव्हिड वॉर्नर – ४५
3) जो रूट – ४४
४) रोहित शर्मा – ४३*
५) स्टीव्ह स्मिथ – ४२

हेही वाचा – IND vs AUS: आज बहुधा बायको नक्की रागावणार! live सामन्यादरम्यान विराटवर विशेष प्रेम दाखवणारे चाहत्याचे पोस्टर व्हायरल

रोहित शर्माने २१२ चेंडूचा सामना करताना १५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२० धावांचे योगदान दिले. त्याला पॅट कमिन्सने बाद केले. दरम्यान भारतीय संघाने ८६ षटकांच्या समाप्तीनंतर ७ बाद २४६ धावा केल्या आहे. त्याचबरोबर ६९ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून शानदार गोलंदाजी करताना टॉड मर्फीने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर पॅट आणि लायनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma scored a century and made a record unable to do by virat kohli and ms dhoni vbm
Show comments