Rohit Sharma Special Post on Shikhar Dhawan Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा विश्वासार्ह सलामीवीर स्टार फलंदाज शिखर धवनने २४ ऑगस्ट रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. टीम इंडियाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीची भारताची एक जबरदस्त जोडी आहे. रोहित शर्माने शिखर धवनच्या निवृत्तीबाबत पोस्टमध्ये दोघांचे एकापेक्षा एक कमाल फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनही लक्ष वेधणार आहे.
रोहित शर्माची शिखर धवनच्या निवृत्तीवर भावुक पोस्ट
रोहित शर्माने शिखरचे पूर्वीपासूनचे काही फोटो पोस्ट शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘रूम शेअर करण्यापासून ते मैदानावरील आयुष्यभराच्या आठवणी शेअर करण्यापर्यंत. तू नेहमीच दुसऱ्या टोकाला राहून माझं काम सोपं केलं आहेस. द अल्टीमेट जाट.’
शिखर-रोहितची सलामी जोडी
शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी २०१३च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा एकत्र सलामी दिली होती. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कार्डिफमध्ये १२७ धावांची भागीदारी केली होती. धवनने त्या सामन्यात पहिले एकदिवसीय शतक झळकावले, तर रोहितने ६५ धावांचे योगदान दिले. या भागीदारीमुळे दोन सलामीच्या फलंदाजांमधील यशस्वी कामगिरीची सुरुवात झाली. या दोघांची सर्वात उल्लेखनीय कामगिरी २०१८ आशिया कपमध्ये झाली, जिथे त्यांनी सुपर फोर सामन्यात पाकिस्तानविरुद्ध २१० धावा जोडल्या. धवन आणि रोहित या दोघांनीही त्या सामन्यात शतकं ठोकल्याने भारताने ६३ चेंडू बाकी असताना नऊ विकेट्स गमावून विजय मिळवला.
धवन-रोहितची भागीदारी केवळ एका फॉरमॅटपुरती मर्यादित नव्हती. कसोटीत धवनने २०१३ मध्ये मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार पदार्पण करत १८७ धावा केल्या होत्या. या खेळीने त्या सामन्यात भारताच्या सहा विकेट्सने विजयाचा पाया रचला. आक्रमक शैलीसाठी ओळखला जाणारा धवनने अनेकदा आघाडी घेतली, तर रोहितने स्थिरता दिली. या संतुलनामुळे त्याला भारतीय संघाचा भक्कम पाया रचला.
धवन व रोहितच्या जोडीने इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून ते दुबईतील आशिया चषकापर्यंत वेगवेगळ्या परिस्थितीत चांगली कामगिरी केली. वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर आणि प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध जुळवून घेण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे भारतीय संघासाठी एक विश्वसनीय सलामीची जोडी बनली.