Rohit Sharma son First Photo Viral: भारत वि. न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा गट टप्प्यातील अखेरचा सामना पाहण्यासाठी क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. याशिवाय हा विराट कोहलीचा ३००वा वनडे सामना होता, तो पाहायला त्याची पत्नी अनुष्का शर्मादेखील दुबईत उपस्थित होती. मात्र, विराट कोहली या सामन्यात काही विशेष करू शकला नाही आणि ११ धावा करून बाद झाला. दरम्यान, अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह आणि मुलगा अहानसोबत दिसत आहे.

टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी अनुष्का शर्मा आणि रितिका सजदेह दुबईच्या मैदानात पोहोचल्या होत्या. यावेळी दोघीही एकत्र दिसल्या. दरम्यान विराटचा भाऊ विकास कोहलीदेखील तिथे उपस्थित होत्या. अनुष्का शर्मा आणि रितिका सजदेहही बराच वेळ एकमेकांशी बोलत होत्या. तर या व्हायरल व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा रोहित शर्मा आणि रितिका सजदेहचा मुलगा अहान यांच्याबरोबर खेळताना दिसत आहे. यावेळी ती अहानसह मस्ती करताना दिसली. अनुष्का शर्माचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून चाहत्यांनी यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

याचबरोबर रोहित शर्माचा लेक अहान शर्माचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे, अनेकांनी हा फोटो शेअर केला आहे. रोहित शर्माचा लेक अगदी लहान असताना त्याची लेक समायरा जशी दिसायता तसा दिसत आहे. त्यामुळे हा फोटो नक्कीच भारत-न्यूझीलंड सामन्यातीलच आहे याबद्दल निश्चितता नाही.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दुसऱ्यांदा बाबा झाला होता. त्याची पत्नी रितिका सजदेह हिने एका मुलाला जन्म दिला. यावेळी रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसह लेकाचा बाप झाल्याची माहिती शेअर केली होती. त्यानंतर अनुष्का शर्माने रोहितच्या पोस्टवर सुंदर प्रतिक्रिया दिली होती. अनुष्काने कमेंटमध्ये हार्ट इमोजी शेअर केला होता.

Rohit Sharma Son Viral Photo
रोहित शर्माच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल (फोटो-एक्स व्हायरल)

विराट आणि अनुष्का गेल्या वर्षी दुसऱ्यांदा आई-वडील झाले होते. त्यांनादेखील एक मुलगी असून अकाय नावाचा दुसरा मुलगा आहे. तर रोहित शर्मालाही मोठी मुलगी आहे जिचं नाव समायरा आहे तर त्याला नोव्हेंबर २०२४मध्ये दुसरा लेक झालं, ज्याचं नाव त्याने अहान ठेवलं आहे.

Story img Loader