Rohit Sharma Emotional Instagram Post For Coach: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने राहुल द्रविड यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविड यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषक २०२४ नंतर संपला आहे. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली आणि कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वखाली भारतीय संघाने तब्बल ११ वर्षांनंतर आयसीसीचे जेतेपद पटकावत ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ संपला आहे आणि यादरम्यानचं रोहित शर्माने एक भावुक पोस्ट राहुल द्रविडसाठी केली आहे.

हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Rohit Sharma, Ritika Sajdeh become parents again to a baby boy
Rohit Sharma : रोहित शर्मा झाला पुन्हा बाबा; टीम इंडियानेच केलं शिक्कामोर्तब! तिलक-संजूसह सूर्याने दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO
rohit sharma ritika sajdeh blessed with a baby boy Posts Goes Viral on Social Media
Rohit Sharma Blessed with Boy: ज्युनियर हिटमॅन, रोहित शर्माला मुलगा झाला? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; पोस्टचा महापूर
donald trump who is Vivek Ramaswamy
ट्रम्प मंत्रिमंडळात महत्त्वाचे पद मिळालेले अब्जाधीश विवेक रामास्वामी कोण आहेत? त्यांचे भारताशी काय नाते? वाचा सविस्तर
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…

रोहित शर्माने राहुल द्रविड यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर करत एक मोठं कॅप्शनही लिहिलं आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये रोहित म्हणाला, “प्रिय राहुल भाई, माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मी योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु मला खात्री आहे का तुमच्याबद्दल बोलण्यासाठी मला शब्द सापडणार नाहीत, पण तरीही एक प्रयत्न मी केला आहे.”

रोहित शर्माची राहुल द्रविडसाठी खास पोस्ट

रोहित पुढे म्हणाला, “माझ्या लहानपणापासून इतर अनेकांप्रमाणे तुम्हाला पाहत तुमचा आदर्श घेत मोठा झालो आहे. पण तुमच्यासोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. तुम्ही या खेळाचे मोठे दिग्गज आहात. परंतु, तुम्ही तुमचं सगळं कर्तृत्व, लोकप्रियता बाजूला ठेऊन भारतीय संघाचे प्रशिक्षक झालात आणि तुम्ही इतकं खेळीमेळीचं वातावरण निर्माण केलंत की आम्ही कोणीही अगदी कितीही मजा मस्करी तुमच्यासोबत सहज करत होतो. तुमची नम्रता आणि एवढ्या काळानंतरही तुमचं या खेळावरअसलेलं प्रेम, हेच तुमचं गिफ्ट आहे. मी तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे आणि ती प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आठवण कायम स्मरणात राहील.”

हेही वाचा – VIDEO: विराट कोहलीचा अलिबागमधील आलिशान बंगला पाहिलात का? कोट्यवधींच्या वास्तूत आहेत या गोष्टी

यानंतर रोहितने एकाच वाक्यात द्रविड आणि त्याच्या ऋणानुबंधाबद्दल सांगितलं, “माझी बायको तुम्हाला वर्क वाईफ म्हणते आणि तुम्हाला या नावाने हाक देता येते यासाठीही मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तुमच्या देदिप्यमान कारकीर्दीत वर्ल्डकपने तुम्हाला हुलकावणी दिली होती. तुमच्या बरोबर वर्ल्डकप पटकावता आला याचा अतीव आनंद आणि समाधान आहे. राहुलभाई तुम्ही माझे जिवलग सुहृद, प्रशिक्षक, आणि मार्गदर्शक मित्र झालात ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”

हेही वाचा – रवी शास्त्रींनी ICC ला दिली आयडियाची कल्पना, म्हणाले….

रोहितने या व्हायरल पोस्टमध्ये सांगितलं की, त्याची पत्नी रितिका सजदेह द्रविड यांना रोहितची वर्क वाईफ म्हणते. योगायोगाने जेव्हा द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदी आले. तेव्हा रोहित तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार होता. या दोन्ही दिग्गजांसह भारताने २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत, २०२३ च्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत आणि विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला आणि अखेरीस रोहित-द्रविड या जोडीने भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषक विजयात मोठी भूमिका बजावली.