Rohit Sharma on World Cup 2023: शेवटचा आयसीसी विश्वचषक २०११ मध्ये भारतात झाला होता, जो महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली यजमान भारताने जिंकला होता. यावेळीही क्रिकेटचा महाकुंभ भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी कर्णधार रोहित शर्मावरही खूप दबाव असेल. याबाबत रोहित म्हणाला की, “माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तणावमुक्त राहणे आणि २०१९ विश्वचषकापूर्वी मी ज्या स्थितीत होतो त्या स्थितीत मला परत जायचे आहे.”

आशिया चषक शिबिरात सामील होण्यापूर्वी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत रोहित म्हणाला, “स्वत:ला कसे तणावमुक्त ठेवावे आणि बाहेर सुरु असणाऱ्या गोष्टींचा जास्त कसा विचार करू नये, मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक. याबाबत मी सध्या स्वतः ला मानसिकदृष्ट्या प्रसन्न ठेवत आहे. २०१९ विश्वचषकापूर्वी मी ज्या झोन मध्ये होतो त्या स्थितीत मला परत जायचे आहे.”

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
KL Rahul Odd Dismissal Video Goes Viral He Gets Bowled Out Between his Legs in India vs Australia A
KL Rahul Wicket Video: असं कोण आऊट होतं??? राहुलची विकेट पाहून चक्रावून जाल, नेमका कसा झाला क्लिन बोल्ड, पाहा व्हीडिओ

हेही वाचा: Wasim Akram: कोण जिंकणार आशिया चषक २०२३? वसीम अक्रमने केली भविष्यवाणी; म्हणाला, “भारत मागच्यावेळी फायनल…”

भारताचा कर्णधार रोहित म्हणाला, “२०१९च्या विश्वचषकापूर्वी मी खूप प्रसन्न मनाने क्रिकेट खेळलो होतो. त्यावेळी कुठलाही दबाव माझ्यावर नव्हता. त्यावेळी माझी मानसिक स्थिती चांगली होती आणि मी स्पर्धेसाठी चांगली तयारी केली होती, तीच गोष्ट आता मी करत आहे.” रोहितने त्या वर्ल्ड कपमध्ये पाच शतकांसह ६४८ धावा केल्या होत्या. यासह तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता.

हिटमॅन पुढे म्हणाला, “माझी त्यावेळी मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली होती कारण, त्यावेळी मी टीम इंडियाचा कर्णधार नव्हतो. आता ही मला परत त्या झोनमध्ये जायचे आहे आणि माझ्याकडे तसे करण्यासाठी सध्या खूप वेळ आहे. २०१९च्या विश्वचषकापूर्वी एक क्रिकेटर म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून मी कोणत्या योग्य गोष्टी करत होतो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मला व्यक्तिशः माझ्या त्या विचारप्रक्रियेची पुनरावृत्ती करायची आहे.”

हेही वाचा: Javelin Throw: वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी ‘हा’ भालाफेकपटू दोन वर्षे आहे घरापासून दूर; म्हणाला, “कदाचित या वर्षी…”

विश्वचषक आणि त्याच्या निकालाबाबत भारतीय कर्णधार म्हणाला, “मला वाटत नाही की एक निकाल किंवा चॅम्पियनशिप एक व्यक्ती म्हणून मला बदलू शकेल. मी गेल्या १६ वर्षात एक व्यक्ती म्हणून बदललो नाही आणि त्या आघाडीवर मला काहीही बदलण्याची गरज वाटत नाही. मी जशी फलंदाजी करत आलो पुढेही तशीच करत राहीन.” ५ ऑक्टोबर पासून विश्वचषक २०२३ला सुरुवात होणार असून भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध असणार आहे.”