Rohit Sharma Statement on IPL 2025 Retention: मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी पाच कॅप्ड खेळाडूंना रिटेन केला आहे. मुंबई संघाने अपेक्षित अशा पाच खेळाडूंना रिटेन केलं आहे. यामध्ये रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या खेळाडूंचा समावेश आहे. मुंबईने उत्कृष्ट वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला १८ कोटी या सर्वाधिक रकमेसह संघात कायम ठेवलं आहे, तर त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या खेळाडूंना १६.३५ कोटी रुपयांना रिटेन केलं आहे तर त्यांच्या खालोखाल संघाने रोहित शर्माला १६.३० कोटींना रिटेन केलं आहे. तर तिलक वर्माला ८ कोटी रुपयांना संघाने रिटेन केलं. संघाच्या मुख्य खेळाडूंना रिटेन केल्यानंतर आता मुंबई इंडियन संघाकडे आयपीएल लिलावासाठी ५५ कोटी रुपये शिल्लक आहेत.

हेही वाचा – MI IPL 2025 Retention: रोहित-सूर्या-हार्दिक-बुमराह रिटेन, बुमराहला सर्वाधिक रिटेंशन किंमत

u

मुंबई इंडियन्स संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर या पाचही खेळाडूंनी मुंबई इंडियन्स संघाबरोबर कायम राहण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. या क्षणाचे काही व्हिडिओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ देखील फ्रॅंचाईजीने शेअर केला आहे. रोहित शर्मा त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणाला आहे ते पाहूया.

हेही वाचा – SRH IPL 2025 Retention: सर्वात मोठी रक्कम! हेनरिक क्लासेनला २३ कोटींमध्ये केलं रिटेन, हैदराबादने भुवनेश्वर कुमारला केलं रिलीज

आयपीएल २०२५ साठी मुंबई इंडियन्स संघाचे रिटेन केलेले खेळाडू (फोटो- Mumbai Indians)

मुंबई इंडियन्स संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक किमतीसह पहिल्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे. यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या हे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत तर चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “मी टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर संघात रिटेन होण्यासाठी हा एक योग्य क्रमांक आहे. जे खेळाडू सध्याच्या घडीला राष्ट्रीय संघाचा भाग आहेत, त्यांना प्रथम प्राधान्य मिळालं पाहिजे, असं मला वाटतं आणि या खेळाडूंना प्रथम प्राधान्य मिळालेलं पाहून मी खूप आनंदी आहे.”

हेही वाचा – PBKS IPL 2025 Retention: पंजाब किंग्ज संघाचा होणार कायापालट, लिलावात चुकून घेतलेल्या खेळाडूसह फक्त एकाला केलं रिटेन

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर चाळीशीकडे झुकलेला रोहित शर्मा अजून किती वर्ष आयपीएल संघातून खेळणार याबाबत साशंकता आहे. पण तो जितकी वर्ष आयपीएलमध्ये खेळेल तितकी वर्ष त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळावं अशी संघाची नक्कीच अपेक्षा असणार आहे आणि त्यावरूनच संघाने त्याला रिटेनही केलं आहे. यानंतर आता लिलावामध्ये संघ कोणकोणत्या खेळाडूंना आणि मुख्यत्वे कोणत्या गोलंदाजांना पुन्हा खरेदी करणार यावर नजरा असणार आहेत. याचबरोबर संघाकडे राईट टू मॅच कार्ड बाकी आहे.

मुंबई इंडियन्सने ईशान किशनला रिलीज केलं आहे त्याचबरोबर गतवर्षी संघाकडून गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करणारे अंशुल कंबोज, आकाश मधवाल आणि पियुष चावला यापैकी कोणत्या खेळाडूसाठी मुंबई इंडियन्स राईट टू मॅच कार्ड वापरणार आणि कोणत्या गोलंदाजांना संघ संधी देण्यात याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.