India vs Bangladesh Rohit Sharma Press Conference: भारताचा कर्णधार रोहित शर्माने १९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशला आपल्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. रोहित शर्माने बांगलादेश संघाला इंग्लंडचे उदाहरण दिले. बांगलादेशचा संघ पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर क्लीन स्वीप करून आल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेला आहे. अशातच आता भारताच्या मैदानावर भारताविरूद्ध खेळण्यासाठी संघ सज्ज झाला आहे. सगळीकडूनच बांगलादेश संघाला साधारण संघ समजू नये, असे म्हटले जात आहेत. पण यादरम्यानच रोहित शर्माने असे काही उत्तर दिले आहे की त्याचं वक्तव्य व्हायरल झालं आहे.

चेन्नईमधील पत्रकार परिषदेत रोहित शर्माला बांगलादेश संघाबद्दल विचारण्यात आले की बांगलादेशचा संघ विशेषत: पाकिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मालिका विजयानंतर आत्मविश्वासाने मैदानावर उतरणार आहे. याबद्दल रोहितने आत्मविश्वासाने उत्तर दिले, की भारत त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची चिंता करण्याऐवजी स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यास प्राधान्य देतो.

Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
India Bangladesh relations, Foreign Secretary talks
भारत-बांगलादेश संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न, परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चेत हिंदूंच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?

हेही वाचा – IND vs BAN Live Streaming: ना सोनी, ना स्टार, या चॅनेलवर पाहता येईल भारत-बांगलादेश मालिकेचं थेट प्रक्षेपण

Rohit Sharma Warns Bangladesh Team: रोहित शर्माने बांगलादेशला दिला इशारा

रोहित शर्मा बांगलादेश संघाच्या प्रश्नाववर उत्तर देताना म्हणाल, “सर्वच संघांना भारताला हरवायचं असतं, भारताला हरवण्यात त्यांना आनंद वाटतो, ठीके मजा घेऊ द्या त्यांनाही. आम्हाला माहितीय आम्ही कसं क्रिकेट खेळतो आणि कसं खेळायचं आहे. इंग्लंडचा संघ जेव्हा भारत दौऱ्यावर आला होता, तेही बऱ्याच काही गोष्टी बोलले होते. पण आम्ही त्यांच्या बोलण्यावर कधी फारसं लक्ष दिलं नाही. आम्हाला फक्त आमच्या तयारीवर लक्ष द्यायचं होतं, आम्ही या सामन्यांसाठी चांगले तयार आहोत का या तयारीवर आम्ही लक्ष देत होतो. जो कोणताही संघ भारतात खेळण्यासाठी येतो आम्ही त्यांचा खूप चांगला अभ्यास करतो आणि आम्ही कायमच आमचं पूर्ण लक्ष यावर ठेवून खेळतो.”

हेही वाचा – Ravichandran Ashwin: “गेल्या ३-४ वर्षांपासून मी खूप…”, बांगलादेशविरूद्धच्या कसोटीपूर्वी रवीचंद्रन अश्विनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य

बांगलादेश मालिकेपासून भारताचा होम सीझन सुरू होत आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला येत्या ४ महिन्यात १० कसोटी सामने खेळायचे आहेत. पाच कसोटी सामने घरच्या मैदानावर तर पाच कसोटी सामने ऑस्ट्रेलियामध्ये खेळायचे आहेत. रोहित शर्मा आणि संघ एक चांगली सुरूवात करण्याच्या प्रयत्नात आहेत. विशेषत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानी आहे पण चांगली कामगिरी करत विजय मिळवून भारताला अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे.

हेही वाचा – Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकाने मैदान गाजवलं, ९ विकेट्स घेत अर्जुनने संघाला मिळवून दिला विजय, पाहा VIDEO

रोहित शर्माने या कसोटी सामन्यांच्या मोसमाची चांगली सुरूवात करण्यावर जोर दिला आणि आपले लक्ष जिंकण्यावर असल्याचे स्पष्ट केले. “आम्ही फक्त विजयाचा विचार करत आहोत आणि त्यानुसारच मी प्लेइंग इलेव्हनची निवड करेन,” असं रोहित म्हणाला.

Story img Loader