Rohit Sharma Statement on T20 WC Final Last 5 Overs: कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला आणि आयसीसी ट्रॉफी आपल्या नावे केले आहे. दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या ५ षटकांमध्ये म्हणजेच ३० चेंडूत ३० धावांची गरज होती. इथून भारतीय संघाने डाव पलटला आणि दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह रोहित शर्माच्या नेतृत्त्वाचेही कौतुक केले जात होते. पण अखेरच्या ५ षटकांमध्ये सामना जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने होता तेव्हा रोहित शर्माच्या मनात नेमकं काय चालू होतं, याबद्दल रोहित शर्माने सांगितलं आहे.

हेही वाचा – IND vs ZIM: एका चेंडूत १३ धावा! यशस्वी जैस्वालचा दुर्मिळ विक्रम, T20I च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं पहिलंच दमदार भाषण, देवेंद्र फडणवीसांनाही केलं लक्ष्य!

दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ३० चेंडूत सहा विकेट्स शिल्लक असताना विजयासाठी फक्त ३० धावा हव्या होत्या आणि भारतीय संघ बॅकफूटवर गेला होता. त्याबरोबरच हेनरिक क्लासेनची वादळी फलंदाजी सुरू होती. भारतीय फिरकीपटूंची त्याने धुलाई करत २३ चेंडूत अर्धशतक करत मैदानात उभा होता. रोहित शर्मा या ५ षटकांबाबत सांगताना म्हणाला की तो ५ षटके शिल्लक असताना तो पूर्णपणे ब्लँक होता. भारताचा कर्णधार पुढे म्हणाला की त्याक्षणी शांत राहून संपूर्ण संघाने रणनीती पार पाडण्यासाठी शांत राहणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा – VIDEO: “कर्णधारपद आणि प्रसिद्धी मिळताच विराट बदलला, पण रोहित…” अनुभवी फिरकीपटू नेमकं काय म्हणाला?

फायनलमधील अखेरच्या षटकांत Rohit Sharma आणि संघाने कसा फिरवला सामना?

“त्यावेळेला मला काहीच सुचत नव्हतं. मी फार पुढचा विचार करत नव्हतो. माझ्यासाठी त्या क्षणी शांत राहून सामन्यावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्वाचं होतं. आम्हा सर्वांसाठी शांत राहत आम्ही जी रणनीती आखली होती ती यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणे खूप महत्वाचे होते,” असे रोहित डलास येथे एका कार्यक्रमात म्हणाला.

“दक्षिण आफ्रिकेला ३० चेंडूत ३० धावांची गरज असताना आम्ही प्रचंड दबावाखाली होतो, तेव्हा आम्ही गोलंदाजांनी केलेल्या पाच षटकांनी हे दाखवून दिले की आम्ही किती शांतपणे ती परिस्थिती हाताळत होतो. इतर कशाचाही विचार न करता आम्ही फक्त आमच्या कामावर लक्ष केंद्रित केले. आम्ही घाबरलो नाही जे आमच्यासाठी खूप चांगले होतं,” असं रोहित तो पुढे म्हणाला.

हेही वाचा – हरभजन-युवराज-रैनाविरूद्ध पोलीस तक्रार दाखल, भज्जीने ‘तो’ व्हीडिओ डीलीट करत मागितली माफी; पाहा नेमकं काय झालं?

शेवटच्या पाच षटकांमध्ये भारताला अवघ्या २९ धावांचा करायचा होता. भारताचा सर्वाेत्कृ्ष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा संघाच्या बचावासाठी आला आणि त्याला इतर दोन वेगवान गोलंदाज हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी चांगली साथ दिली. बुमराहने त्याच्या स्पेलमधील शेवटच्या षटकात अवघ्या सहा धावा दिल्या आणि त्याला मार्को यान्सेनला क्लीन बोल्ड करत मोठी विकेट मिळवून दिली.

अर्शदीप सिंगनेही १९व्या षटकात केवळ चार धावा देत दबाव कायम ठेवला. हार्दिक पांड्याला १७व्या षटकात क्लासेनची सर्व-महत्त्वाची विकेट मिळाली. या अष्टपैलू खेळाडूने महत्त्वपूर्ण शेवटचे षटक टाकले आणि पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवच्या चित्तथरारक झेलसह डेव्हिड मिलरला बाद केले. सूर्यकुमार यादवच्या कॅचनंतर भारतीय संघाने विजयावर शिक्कामोर्तब केले.

Story img Loader