Rohit Sharma Statement on India Series Defeat in IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा ०-२ असा पराभव झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली. या मालिकेत रोहित शर्माने चांगली फलंदाजी केली, पण रोहितशिवाय भारताची संपूर्ण फलंदाजी फळी फेल ठरली. तिसऱ्या सामन्यातही भारताचा ११० धावांनी मोठा पराभव झाला. या पराभवासह श्रीलंकेने २७ वर्षांनी भारताविरूद्ध वनडे मालिका जिंकली आहे. या पराभवानंतर रोहित शर्माच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – Vinesh Phogat: “पदक जिंकू शकले नाही हे दुर्देव पण…” ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर विनेश फोगटची पहिली प्रतिक्रिया

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

IND vs SL ODI Series: भारताच्या मालिका पराभववावर रोहित शर्मा काय म्हणाला?

भारत-श्रीलंका मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. यानंतर श्रीलंकेने शेवटचे दोन सामने जिंकून मालिका जिंकली. १९९७ नंतर प्रथमच श्रीलंकेने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे. म्हणजेच २७ वर्षांनंतर श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव केला आहे. या मालिकेत भारतीय संघाचे फलंदाज फिरकीसमोर त्रस्त दिसले. सामन्यानंतर रोहितला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “मला वाटत नाही की ही चिंतेची बाब आहे, परंतु वैयक्तिक स्तरावर आणि गेमप्लॅन म्हणून ही गोष्ट अशी आहे जी आम्ही गांभीर्याने घेतली पाहिजे.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 12: काहीच वेळात मीराबाई चानू आणि अविनाश साबळे यांच्या स्पर्धांना होणार सुरूवात

रोहितला जेव्हा विचारण्यात आले की टी-२० विश्वचषक २०२४ च्या विजयानंतर टीम इंडिया थोडी बेफिकीरपणे खेळली का? यावर रोहित म्हणाला, “नाही, हा जोक आहे. तुम्ही भारताकडून खेळता तेव्हा निष्काळजी राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी कर्णधार असताना तर हे शक्यच नाही. पण तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळले त्यांना श्रेय द्यावे लागेल. श्रीलंका आमच्यापेक्षा नक्कीच चांगली खेळली. आम्ही परिस्थितीनुसार आमच्या सर्वोत्तम संघ संयोजनासह खेळलो. आमच्या संघात असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यामुळे संघात बदल करण्यात आले.”

संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, आम्हाला काही विभागांमध्ये सुधारणा करावी लागेल, त्यावर लक्ष दिले जाई. मालिकेत विजय-पराजय आहेत आणि ही मालिका गमावणे हा आमच्यासाठी जगाचा शेवट नाही. तुम्ही एखाद मालिका गमावाल, पण पराभवानंतर तुम्ही परत कसे कमबॅक करता हे जास्त महत्त्वाचे आहे.

विजयानंतर श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका म्हणाला की, कर्णधार म्हणून मी आनंदी आहे. या मालिकेत आम्ही चांगली कामगिरी केली. आम्हाला माहित होते की भारताची फलंदाजी खूप मजबूत आहे आणि आम्हाला आमच्या ताकदीवर अवलंबून राहायचे आहे आणि फिरकी गोलंदाजी ही आमची ताकद आहे आणि आम्ही याच गोष्टीला पाठिंबा दिला. या विजयात सनथ जयसूर्याचे मोठे योगदान असल्याने संघातील वातावरण चांगलेच होते.

Story img Loader