Rohit Sharma Statement on India Defeat: ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून पराभव केला. यासह ही पाच सामन्यांची कसोटी मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे. या सामन्यात भारताचे फलंदाज आपली जबाबदारी पार पाडू शकले नाहीत, ज्याचा संघाला फटका बसला. आता भारताच्या पराभवाचं रोहित शर्माने कोणावर फोडलं, वाच

दिवस रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया आमच्यापेक्षा चांगला खेळला आणि आम्ही चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलो ज्याचे आम्हाला परिणाम भोगावे लागले, असे कर्णधार म्हणाला. आम्हाला पर्थप्रमाणे या कसोटीत जिंकण्यासाठी चांगली कामगिरी करायची होती, मात्र प्रत्येक कसोटीचे आव्हान वेगळे असते, असे कर्णधार रोहितने म्हटले आहे.

हेही वाचा – WTC points Table: ना पहिलं, ना दुसरं स्थान, भारताला दुसऱ्या कसोटी पराभवानंतर WTC गुणतालिकेत मोठा धक्का; ‘या’ क्रमांकावर घसरला संघ

भारताच्या दुसऱ्या कसोटी पराभवानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

रोहित शर्मा म्हणाला, “आमच्यासाठी हा निराशाजनक आठवडा होता, आम्ही चांगले खेळलो नाही. त्याचा फटका आम्हाला सहन करावा लागला. ऑस्ट्रेलिया आमच्यापेक्षा चांगला खेळली. आम्ही आमच्या संधींचा फायदा घेऊ शकलो नाही. आम्ही पर्थमध्ये जशी कामगिरी केली होती, तशीच उत्कृष्ट कामगिरी आम्हाला पुन्हा करायची होती पण प्रत्येक कसोटी सामन्याचे वेगळे आव्हान असते. आम्हाला माहित होतं की गुलाबी चेंडू कसोटी आव्हानात्मक असणार आहे. पण मी जसं बोललो त्याप्रमामे ऑस्ट्रेलिया आमच्यापेक्षा चांगली खेळली.

हेही वाचा – Siraj on Travis Head Fight: “हेडने सांगितलं ते खोटं आहे…”, मोहम्मद सिराजचं ट्रॅव्हिस हेडच्या वादावर मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

रोहित तिसऱ्या कसोटीबाबत म्हणाला, हो आता आम्ही गाबा कसोटीसाठी खूप उत्सुक आहोत. तिसऱ्या कसोटी सुरू होण्यासाठी फार वेळ नाही आहे. यानंतर आता पर्थ कसोटीत आम्ही कशी कामगिरी केली होती आणि गेल्या वेळेस गाबा कसोटीत कसे खेळलो होतो, याचा विचार करायचा आहे. गाबाच्या मैदानावर काही खरोखरच चांगल्या आठवणी आहेत. आम्हाला चांगली सुरुवात करायची आहे आणि चांगले खेळायचे आहे.”

हेही वाचा – NZ vs ENG: न्यूझीलंडचा मोठा पराभव! टीम इंडियाला चीतपट करणाऱ्या किवींची घरच्या मैदानावर इंग्लंडसमोर शरणागती

कर्णधार रोहित शर्माने पराभवाचे खापर फलंदाज किंवा गोलंदाजांवर फोडले नाही, तर पराभवासाठी संपूर्ण संघाला जबाबदार धरले. पर्थ कसोटीतील अनुपस्थितीनंतर रोहित शर्माने दुसऱ्या कसोटीत कर्णधार म्हणून पुनरागमन केले. कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावे हा चौथा पराभव आहे. मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामने गमावले आहेत. आता ब्रिस्बेनमध्ये कसोटी विजयाचे भारतासमोर मोठे आव्हान असणार आहे. कारण जर भारताने आणखी एक सामना गमावला तर त्यांच्यासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप म्हणजेच WTC च्या अंतिम फेरीत पोहोचणे कठीण होईल. भारताला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

Story img Loader