Rohit Sharma Explains Reason Behind India defeat IND vs AUS Melbourne Test: बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून १८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे टीम इंडिया आता मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या गुणतालिकेतही भारताला धक्का बसला आहे. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माही निराश दिसला. रोहित शर्माने भारताच्या पराभवाचे कारणही सांगितले.

भारताच्या पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला, “खूप निराशाजनक. आम्हाला शेवटपर्यंत कडवी लढत द्यायची होती पण दुर्दैवाने आम्ही ते करू शकलो नाही. केवळ शेवटच्या सत्राचे मूल्यांकन करणं कठीण होईल. संपूर्ण कसोटी सामना पाहावा लागेल, आमच्याकडे संधी होती पण आम्ही त्या संधीचा योग्य फायदा घेऊ शकला नाही आणि ऑस्ट्रेलियाचा संघ ६ बाद ९० धावांवर असताना त्यांना सामन्यात पुनरागमन करू दिले. मला माहित आहे की गोष्टी कठीण होऊ शकतात, परंतु आम्ही त्यासाठीच खेळत आहोत, आम्हाला कठीण परिस्थितीत चांगली कामगिरी करता येईल यासाठी खेळायचे होते.”

Akash Deep Ruled out of Sydney Test with back issue confirms coach Gambhir Ahead of IND vs AUS
IND vs AUS: सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू झाला संघाबाहेर; गौतम गंभीरने दिली माहिती
Why a Shivaji statue in Ladakh has sparked a debate
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लडाखमधल्या पुतळ्यावरून वाद; नेमकं प्रकरण…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Rohit Sharma Might Dropped From Sydney Test Head Coach Gautam Gambhir Statement IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्माला सिडनी कसोटीतून वगळणार? कोच गंभीरच्या उत्तराने सर्वांनाच बसला धक्का; कर्णधाराच्या खेळण्याबाबत संभ्रम
Actor Bharat Jadhav
Bharat Jadhav : भरत जाधवचा नाटकात फसलेला विनोद कुठला? त्यानेच सांगितलेला अफलातून किस्सा काय?
rohit sharma performance in last 15 innings in test match
गेल्या १५ डावांत एकदा ५०, दोनदा २०… अपयशी रोहितची सिडनी कसोटी अखेरची? कर्णधारपदासाठी दावेदार कोण?
Mangal rashi parivrtan 2024
पुढील ८४ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार बक्कळ पैसा
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताला पराभवानंतर धक्का, अंतिम फेरी गाठण्याकरता भारतासाठी कसं असणार समीकरण?

रोहित शर्मा पराभवाचे कारण सांगत पुढे म्हणाला, “मी याबाबत खूप विचार केला की एक संघ म्हणून आम्ही आणखी काय करू शकलो असतो, पण आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने चांगलाच तडाखा दिला. त्यांच्या तळाच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. शेवटच्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीत त्यांनी कडवी झुंज दिली. आम्हाला संधी होती पण आम्ही त्याचा फायदा उठवू शकलो नाही. कदाचित त्या क्षणीच आम्ही सामना गमावला.”

हेही वाचा – “विराट खेळत राहील पण रोहित…”, रवी शास्त्रींचं विराट-रोहितच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य, कर्णधाराबद्दल स्पष्टच बोलताना म्हणाले…

रोहित पुढे म्हणाला, “आम्हाला माहीत होते की ३४० धावा करणं आमच्यासाठी सोपं असणार नाही. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले, जर आम्हाला दोन सत्रात विकेट मिळाल्या असत्या तर आम्ही लक्ष्य गाठू शकलो असतो, परंतु त्यांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली.”

हेही वाचा – Yashasvi Jaiswal Wicket: यशस्वी जैस्वाल आऊट की नॉट आऊट? तिसर्‍या पंचांच्या निर्णयावरून मतमतांतरं; पुन्हा एकदा भारताविरूद्ध चुकीचा निर्णय?

नितीश रेड्डीच्या शतकाबाबत रोहित शर्मा म्हणाला, नितीश रेड्डी ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच आला आहे, इथे कठिण परिस्थितीत खेळावं लागतं, पण त्याने शानदार कामगिरी केली. यायचबरोबर तो चांगल्या टेक्निकने खेळला. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे आणि त्यांच्याकडे यशस्वी होण्याची सर्व कौशल्ये आहेत. त्याचं कौशल्य आणि त्याची खेळण्याची पद्धत आम्हाला माहित आहे आणि आम्ही त्याला अनेक वर्षांपासून खेळताना पाहत आहोत. त्याला फक्त इथे येऊन देशासाठी खेळायचे आहे, हेच तो या दौऱ्यावर करत आहे, दुर्दैवाने त्याला दुसऱ्या टोकावरून हवी तितकी साथ मिळाली नाही. पण तो ज्यापद्धतीने खेळला आहे ते कमालीचं आहे.

Story img Loader