Rohit Sharma Statement on India Defeat IND vs NZ: रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाला २४ वर्षांनंतर पहिल्यांदाच लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सलग तिसरा सामना किवी संघाने जिंकत भारताला मालिकेत ३-० ने पराभूत केलं. या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. टीम इंडियाला तिसऱ्या कसोटी सामन्यात २५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. २४ वर्षांनंतर टीम इंडियाला भारतातील मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. भारतीय संघाने २००० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा क्लीन स्वीप केला होता.

भारताच्या पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला, “एखादी मालिका, कसोटी सामना गमावणं हे सोपं नाही. हा पराभव अजिबातच सहन होण्यासारखं नाही. पुन्हा हेच म्हणेन की आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो नाही आणि हे आम्हाला माहित आहे आणि आम्ही ते मान्यही करतो. न्यूझीलंड संघाने संपूर्ण मालिकेत खूप चांगली कामगिरी केली. आम्ही खूप चुका केल्या आहेत आणि आम्हाला त्या मान्यही कराव्या लागतील.”

हेही वाचा – WTC Points Table: भारताने गमावले पहिले स्थान, WTC गुणतालिकेत सलग ३ पराभवांनंतर बसला मोठा धक्का

फलंदाजीबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही दोन्ही कसोटींच्या पहिल्या डावात चांगल्या धावा करू शकलो नाही आणि त्यामुळे आम्ही मागे पडलो. तिसऱ्या कसोटीत आम्ही ३० धावांची आघाडी मिळवली होती आणि आम्हाला वाटलं की आम्ही सामन्यात पुढे आहोत. न्यूझीलंडने दिलेले लक्ष्य (१४७ धावा) गाठण्यासारखे नक्कीच होते. पण आम्हाला चांगली कामगिरी करण्याची गरज होती.”

हेही वाचा – IND vs NZ : टीम इंडियाचा सलग तिसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव! न्यूझीलंडने व्हाइट वॉश करत भारतात घडवला इतिहास

रोहित शर्माने त्याच्या फलंदाजीबद्दल निराशा व्यक्त करताना सांगितले की, “मी जेव्हा फलंदाजीला उतरलो तेव्हा माझ्या डोक्यात बरेच विचार, रणनिती सुरू होत्या. पण या मालिकेत तेमी प्रत्यक्षात आणू शकलो नाही, हे माझ्यासाठी खूपच निराशाजनक आहे. इतर फलंदाजांनी दाखवून दिलं की या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची असते. या खेळपट्टीवर पुढे येऊन बचावात्मक फलंदाजी करावी लागते, अशा खेळपट्टींवर आम्ही गेल्या ३-४ वर्षात खेळलो आहोत. पण या मालिकेत आम्ही पूर्णपणे अयशस्वी ठरलो आणि हे खूपच त्रासदायक आहे.”

हेही वाचा – IND vs NZ: वॉशिंग्टन सुंदरमुळे सुनील गावसकरांनी जेवताना फोडली प्लेट, रवी शास्त्रींनी कॉमेंट्री करताना सांगितलं नेमकं काय घडलं?

कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला, “माझ्यामते मी एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करू शकलो नाही. ही गोष्ट मला खूप त्रास देणार आहे. आम्ही एकत्रितपणे चांगली कामगिरी केली नाही आणि हेच या पराभवाचे कारण आहे.” इतकंच नव्हे तर सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्माने संघाच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतो, असही रोहित शर्मा म्हणाला. या मालिकेनंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात खेळवली जाईल.

o

Story img Loader