Rohit Sharma Statement on India Win and Rishabh Pant: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये भारताने बांगलादेशचा २८० धावांच्या फरकाने पराभव करून २०२३-२५ ​​च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी आपली दावेदारी अधिक मजबूत केली आहे. या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली होती, पण संघाने पुनरागमन करत सामन्यावर आपली पकड इतकी मजबूत केली चौथ्या दिवशीच पहिला कसोटी सामना जिंकला. या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा भारताच्या विजयाबाबत काय म्हणाला, जाणून घेऊया.

हेही वाचा – IND vs BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, गेल्या ९२ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट

भारताच्या विजयावर काय म्हणाला रोहित शर्मा?

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “पुढील कसोटी सामन्यांची मालिका लक्षात घेता हा एक मोठा विजय आहे. आम्ही बऱ्याच दिवसांनी कसोटी सामने खेळत आहोत. पण, क्रिकेटपटू कधीच क्रिकेटच्या बाहेर नसतात. आम्ही एका आठवड्यापूर्वी इथे आलो होतो आणि आम्हाला असाच निकाल अपेक्षित होता.”

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताला मोठा फायदा, पराभवामुळे बांगलादेशला फटका, तर ‘या’ संघांना झाला फायदा

ऋषभ पंतवर रोहित शर्माचे वक्तव्य

यानंतर पुढे ऋषभ पंतच्या शतकाबाबत बोलताना म्हणाला, “त्याने कठीण काळाचा सामना करून पुनरागमन केले. ज्यापद्धतीने ऋषभने स्वत:ला या कठीण काळातून सावरले आणि हे शतक झळकावले आहे, ते पाहण्यासारखे होते. त्याने आयपीएलमधून पुनरागमन केले आणि त्यानंतर टी-२० वर्ल्डकपमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आणि पंतचा तर हा सर्वात आवडता फॉरमॅट आहे. तो मैदानावर जाऊन बॅटने कशी कामगिरी करेल हा प्रश्न कधीच नसतो. त्याने यापूर्वी फलंदाजी आणि यष्टीरक्षणामध्ये कशी कामगिरी केली आहे, हे आपल्याला चांगलंच माहित आहे. त्याला फक्त सेट होण्यासाठी वेळ देण्याची गरज होती. या सर्वाचे श्रेय त्याला जाते, त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये खेळून या कसोटी सामन्यासाठी सराव केला आणि पहिल्याच कसोटीत प्रभाव पाडला.”

हेही वाचा – VIDEO: रोहितने बोलता बोलता मुद्दाम शुबमनला मारलं, विराटने कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतंय सांगताच कॅप्टनने पाहा काय केलं?

चेन्नईच्या खेळपट्टीबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “या सामन्याची खेळपट्टी अशी होती की त्यासाठी संयमाची गरज होती. आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत तेच केलं.’ रोहित शर्माने रविचंद्रन अश्विनबद्दल बोलताना सांगितले की तो नेहमी संघासाठी चेंडू आणि फलंदाजीमध्ये चोख कामगिरी बजावतो. तो नेहमीच चमकदार कामगिरी करतो.”

अश्विनबद्दल रोहित म्हणाला, “त्याने या कसोटीत जो पराक्रम केला ते तो स्वत:च सांगू शकतो. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा अश्विन बॅट किंवा बॉलने चमकदार कामगिरी करत आला आहे. त्याने संघाबद्दल जे केलं आहे ते इथे बोलून संपणार नाही. आपण नेहमीच पाहिलं आहे की तो येऊन त्याची कामगिरी बजावतो, जे खूपच कमाल आहे. त्याने या कसोटी सामन्यापूर्वी आयपीएलमध्ये स्पर्धात्मक क्रिकेट खेळले होते आणि त्यानंतर तमिळनाडू प्रिमियर लीगमध्ये खेळण्याचा आनंद लुटला. जिथे त्याला आपण टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना पाहिलं आणि याचाच त्याला फलंदाजी करताना फायदा झाला.”