Rohit Sharma Statement on India win IND vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील अखेरचा गट टप्प्यातील सामना भारत वि. न्यूझीलंड यांच्याच खेळवला गेला. गट टप्प्यात टीम इंडियाने उत्कृष्ट कामगिरी करत तिन्ही सामने जिंकले आहेत. दुबईत २ मार्चला न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या सामन्यात भारताने उत्कृष्ट कामगिरी करत ४४ धावांनी नेत्रदीपक विजय मिळवला. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ८व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करणारे खेळाडू होते. यासह भारताने चांगली धावसंख्या रचली आणि फिरकीपटूंच्या मदतीने संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या विजयानंतर रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्मा सामन्यानंतर म्हणाला, “अशारितीने मोठा विजय मिळवत स्पर्धेचा शेवट करणं महत्त्वाचं होतं. न्यूझीलंडचा संघ खूप कमाल आहेच आणि अलीकडच्या काळात त्यांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळलं आहे. पहिल्या पॉवरप्लेमध्ये सुरुवातीच्या विकेट्स गमावल्यानंतर अक्षर आणि श्रेयसची भागीदारी खूप महत्त्वाची होती. दोन्ही खेळाडूंनी आम्हाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.”

गोलंदाजी युनिटबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “आमची दर्जेदार गोलंदाजी पाहता आम्ही या लक्ष्याचा बचाव करण्यात यशस्वी ठरू याची मला खात्री होती. वरुण एक वेगळा गोलंदाज आहे. आम्हाला त्याला संधी द्यायची होती आणि संघासाठी कशी कामगिरी करतो हे पाहायचे होते. पुढच्या सामन्यात काय करता येईल याचा आम्हाला विचार करायचा आहे, पण हा विचार करणं ही एक चांगली डोकेदुखी असणार आहे. वरूण जर चांगली गोलंदाजी करत असेल तर तो काय चेंडू टाकेल हे कळणं अवघड असत.”

रोहित शर्मा पुढे म्हणाला, “अशा छोट्या स्पर्धांमध्ये लय फार महत्त्वाची असते. चांगलं खेळून सामना जिंकणं महत्त्वाचं असत, चांगली कामगिरी करत सर्वकाही अचूक करण्याचा प्रयत्न करायचा असतो. चूका होतात पण त्या चूका सुधारणही महत्त्वाचं आहे.”

ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्याबाबत रोहित म्हणाला, “तो एक चांगला सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा इतिहास आहे. सामन्याच्या दिवशी आम्हाला मैदानावरील सर्वच गोष्टींमध्ये अचूक असाव लागणार आहे. आशा आहे त्या सामन्याचा निकाल आम्ही आमच्या बाजूने वळवून घेऊ.” भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य फेरीचा सामना ४ मार्चला दुबईत ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणार आहे.