Rohit Sharma Statement on Series Win IND vs BAN: भारताने दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी बांगलादेशचा संघ ७ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह भारताने बांगलादेशचा दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने पराभव केला आणि ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) टेबलमध्ये आपले स्थान आणखी मजबूत केले. रोहित शर्माच्या आणि संघाच्या रणनितीमुळे भारताने या सामन्यात विजय मिळवला आहे.

भारताच्या मालिका विजयावर रोहित शर्माचे वक्तव्य

भारताच्या विजयानंतर रोहित शर्मा रणनिती सांगताना म्हणाला, “चौथ्या दिवशी जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा आम्ही शक्या तितक्या लवकर बांगलादेशला ऑलआऊट करण्यावर आमचा भर होता आणि आम्हाला पाहायचं होतं की फलंदाजी करताना आम्ही काय करू शकतो. जेव्हा ते (बांगलादेश) २३० धावांवर ऑलआऊट झाले. तेव्हा आम्हाला किती धावांचं लक्ष्य मिळालं आहे यापेक्षा आम्ही त्यांना किती षटकात ऑल आऊट केलं याचा विषय होता. म्हणजेच जास्तीत जास्त नेट रेन रेट धावा करत चांगली धावसंख्या उभारायची होती. खेळपट्टीकडून गोलंदाजांना फारशी काही मदत नव्हती. फारसे काही नव्हते. पण त्या खेळपट्टीवर खेळत गोलंदाजांनी जी कामगिरी केली ती वाखाणण्याजोगी आहे.”

Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “
Chhagan Bhujbal Uday Samant
लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”
PM Narendra Modi on Godhra Train Burning
“मी जबाबदारी घेतो, हवं तर लिहून देतो, पण…”, पंतप्रधान मोदींचं गोध्रा जळीतकांडावर भाष्य
Vijay Wadettiwar
“जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत”, ‘त्या’ दोन नेत्यांकडे बोट दाखवत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य

हेही वाचा – Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालने थेट सेहवागला दिली टक्कर, भारताच्या कसोटी इतिहासात रोहित-विराट-धवन यांनाही जमली नाही अशी कामगिरी

रोहित शर्माने भारताच्या विजयानंतर सांगितली संघाची रणनिती

गोलंदाजीनंतर आक्रमक फलंदाजीबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “मग आक्रमक फलंदाजी करण्याच्या मानसिकतेसह फलंदाजांनी मैदानात जाऊन शक्य तितक्या झटपट धावा काढणं अपेक्षित होतं. ही एक जोखीम पत्करण्यास आम्ही तयार होतो कारण जेव्हा तुम्ही अशी आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा कमी धावसंख्येवर बाद होण्याची शक्यताही जास्त असते. भले आम्ही १००-१५० धावांवर ऑल आऊट झालो असतो पण तरीही आम्ही ही जोखीम पत्करण्यासाठी तयार होतो. आम्हाला काही करून ही जोखीम पत्करत सामन्यात कायम राहत या सामन्याला निकाल मिळावा, असा प्रयत्न होता.”

हेही वाचा – IND vs BAN: टीम इंडियाने कानपूर कसोटीत लिहिला नवा इतिहास, २१व्या शतकात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

रोहित शर्माने रणनिती सांगितल्याप्रमाणे भारताने पहिल्या डावात अवघ्या ३४.४ षटकांत २८५ धावा करत डाव घोषित केला. या विक्रमी खेळीसह भारतीय संघाने आणि फलंदाजांनी अनेक विविध रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. यशस्वीने कसोटी क्रिकेटमध्ये जलद अर्धशतक झळकावले तर रोहित शर्मा कसोटीतील पहिल्याच दोन चेंडूवर षटकार लगावणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला. तर यासह भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५०, १०० आणि २०० धावांचा टप्पा गठणारा पहिला संघ ठरला.

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताची मोठी झेप, अंतिम फेरीसाठी दावेदारी मबजूत

बांगलादेशने दिलेल्या ९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांच्यात ५८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर १७.२ षटकांत तीन गडी गमावून ९८ धावा करून सहज विजयाची नोंद केली. यादरम्यान यशस्वी जैस्वालने शानदार अर्धशतकही झळकावले. भारताने कर्णधार रोहित शर्मा (०८) आणि शुभमन गिल (०६) यांच्या विकेट्स लवकर गमावल्या. तत्पूर्वी, भारताकडून जडेजा (३ विकेट), जसप्रीत बुमराह (३) आणि रविचंद्रन अश्विन (३) यांनी प्रत्येकी तीन, तर आकाश दीपने एक विकेट घेतली.

Story img Loader