Rohit Sharma Statement on Jasprit Bumrah Vice Captaincy: टीम इंडियाला न्यूझीलंडविरूद्ध मायदेशात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत जसप्रीत बुमराहबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आगामी भारत वि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील एका सामन्यात रोहित शर्मा त्याच्या खाजगी कारणांमुळे अनुपस्थित असणार आहे. यादरम्यान संघाच्या नेतृत्त्वाबद्दल रोहित नेमकं काय म्हणाला आहे, जाणून घ्या.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जसप्रीत बुमराहची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. त्याने मुख्य वेगवान गोलंदाजाला नेतृत्व गटाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले आहे, ज्याला खेळाची उत्तम समज आहे. बुमराहला बुधवारपासून येथे सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी उपकर्णधार घोषित करणे हे आश्चर्यकारक होते, कारण बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत रोहितबरोबर भारताचा कोणीही उपकर्णधार नव्हता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही बुमराह भारताचा उपकर्णधार होईल, यासह रोहितला बुमराहबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

हेही वाचा – Rohit Sharma on Mohammed Shami: “शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणं शक्य नाही…”, रोहित शर्माने मोहम्मद शमीबद्दल केलं मोठं वक्तव्य, कर्णधार नेमकं काय म्हणाला?

पीटीआयने १० ऑक्टोबर रोजी सांगितले होते की रोहित वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियातील किमान एका कसोटी सामन्यातून बाहेर राहिल. रोहितने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बुमराहला सांगितले की, “बुमराह खूप क्रिकेट खेळला आहे. मी त्याच्याबरोबर खूप क्रिकेट खेळलो आहे. त्याला खेळाची चांगली समज आहे. डावपेचांवर मी फार काही बोलू शकत नाही, कारण त्याने फार वेळा संघाचे नेतृत्त्व केलेले नाही. त्याने एक कसोटी आणि काही कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. परंतु, जेव्हा सामन्याबाबत त्याच्याशी चर्चा करतो, तेव्हा जाणवतं की त्याला खेळ तर समजतो पण सामन्यात त्या घडीला काय आवश्यक आहे, हेही त्याला नीट कळतं. जेव्हा अशी स्थिती निर्माण होईल जिथे तुम्हाला सामन्यात पुढे जाण्यासाठी एका योग्य नेतृत्त्वाची गरज आहे, तेव्हा मला वाटतं बुमराह त्यापैकी एक असेल.”

हेही वाचा – Ranji Trophy: कोण आहे गुरजपनीत सिंह? विराट कोहलीच्या सल्ल्याने चेतेश्वर पुजाराला रणजी ट्रॉफीमध्ये केलं आऊट, ठरला तमिळनाडूच्या विजयाचा हिरो

पुढे रोहित म्हणाला, “तो (बुमराह) नेहमीच आमच्या नेतृत्व गटाचा भाग असतो — मग तो नव्या युवा गोलंदाजांशी चर्चा करणं असो किंवा सामन्यात पुढील रणनिती काय असेल, याबद्दल चर्चा करण्यासाठी पुढाकार घेणं असो. तो अनुभवी तर आहेच. त्यामुळे सामना पुढे कसा न्यायचा याविशयी गोलंदाजांशी बोलकताना बुमराह आजूबाजूला असणं खूप फायदेशीर असते.

भारताने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर १७ कसोटी जिंकल्या आहेत. टीम इंडियाने अद्याप घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सर्व कसोटी मालिकेत टीम इंडियाचा कायमच वरचढ राहिलेला आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्ध १२ कसोटी मालिका जिंकल्या आहेत, तर किवी संघाने कसोटी मालिकेत भारताचा ७ वेळा पराभव केला आहे. यामध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या सीझनमधील अंतिम सामन्याचाही समावेश आहे, ज्यामध्ये न्यूझीलंडने इंग्लंडमध्ये भारताचा पराभव करून प्रथमच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकली.