Rohit Sharma on Mohammed Shami: भारतीय संघ बुधवार १५ ऑक्टोबरपासून मायदेशात न्यूझीलंड संघाविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे होणार आहे. दरम्यान, सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. भारत-न्यूझीलंड या मालिकेबद्दल बोलताना रोहित शर्माने मोहम्मद शमीबाबत मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने भारताचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज असलेल्या मोहम्मद शमीबद्दल मोठा खुलासा केला आहे. रोहित शर्माने दिलेल्या या वक्तव्याने भारतीय संघासमोर नक्कीच मोठ अडचण निर्माण झाली आहे. मोहम्मद शमी अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. तो आता सुरू होणाऱ्या न्यूझीलंड मालिकेचा भाग तर नाही, पण पुढील मालिकेत खेळू शकेल की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहे.

हेही वाचा – Ranji Trophy: कोण आहे गुरजपनीत सिंह? विराट कोहलीच्या सल्ल्याने चेतेश्वर पुजाराला रणजी ट्रॉफीमध्ये केलं आऊट, ठरला तमिळनाडूच्या विजयाचा हिरो

रोहित शर्मा मोहम्मद शमीबाबत नेमकं काय म्हणाला?

मोहम्मद शमीबद्दल बोलताना रोहित शर्माने सांगितलं, ‘खरं सांगायचं तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शमीबाबत निर्णय घेणं खूप अवघड आहे. त्याला आणखी एक धक्का बसला असून त्याच्या गुडघ्याला पुन्हा सूज आली आहे. आता त्याला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. शमी एनसीएमध्ये डॉक्टर आणि फिजिओच्या देखरेखीखाली आहे. दुखापत असलेल्या शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाऊ शकत नाही. तो लवकर दुखापतीतून सावरेल अशी आशा आहे. मोहम्मद शमीच्या दुखापतीबद्दल अलीकडे आलेला रिपोर्ट काही प्रमाणात खरा असल्याचे रोहित शर्माच्या या विधानावरून खरा होता, अशीही चर्चा आहे.

हेही वाचा – Hardik Pandya: “अखेर मला असा कोणीतरी भेटला…”, म्हणत ‘या’ भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीने शेअर केले हार्दिक पंड्याबरोबरचे फोटो

शमीला पुन्हा दुखापत झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली तेव्हा गोलंदाजाने लिहिले होते की, अशा निराधार अफवा का पसरवल्या जात आहेत आणि मी बरा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शमी म्हणाला की, बीसीसीआय आणि मी बॉर्डर-गावसकर मालिकेतून बाहेर असल्याचे म्हटलेले नाही. शमीने चाहत्यांना अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नये असेही आवाहन केले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका पाच सामन्यांची असणार आहे. तर बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये कोणते संघ अंतिम फेरीत खेळतील हे या मालिकेतून निश्चित होण्याची शक्यता आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण एखाद्या सामन्याच्या निकालानेही पूर्ण गुणतालिकेत बदल घडून येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma statement on mohammed shami injury said we dont want to bring injured shami to australia ind vs aus bdg