Rohit Sharma Reveals He Convinced R Ashwin to Stay Till Pink Ball Test: गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर रवीचंद्रन अश्विनने निवृत्ती जाहीर करत भारतीय चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. गाबा कसोटीचा निकाल लागल्यानंतर रोहित शर्माबरोबर पत्रकार परिषदेत उपस्थित राहून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. अश्विनने निवृत्ती जाहीर करत निघून गेला पण त्यानंतर रोहित शर्माने त्याला पिंक बॉल कसोटीपर्यंत थांबावं यासाठी रोहितने त्याला मनवलं होतं.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी अंतिम टप्प्यात असताना रविचंद्रन अश्विन निवृत्त होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. सामना अनिर्णित राहण्याची घोषणा होताच काही वेळाने अश्विन आपला कर्णधार रोहित शर्माबरोबर पत्रकार परिषदेत पोहोचला आणि त्याने निवृत्तीची घोषणा केली. आता तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. मात्र उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्येही तो संघाबरोबर नसणार आहे. अश्विनने जड अंत:करणाने निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र तरीही तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.

हेही वाचा – IND vs AUS: गाबा कसोटीत पावसाचाच खेळ, कसोटी अनिर्णित; मालिका बरोबरीतच

रोहित शर्मा अश्विनच्या निवृत्तीबाबत बोलताना म्हणाला, “जेव्हा मी पर्थमध्ये पोहोचलो तेव्हा अश्विनच्या निवृत्तीबाबत मला कळलं. पहिल्या कसोटीच्या सुरूवातीला मी तिथे काही दिवस नव्हतो. तेव्हापासूनच निवृत्तीचं त्याच्या डोक्यात होतं. यामागे अनेक कारणं असतील. अश्विन जेव्हा उत्तर देण्याच्या मनस्थितीत असेल तेव्हा यामागचं कारण तो सांगेल. संघ नेमका काय विचार करतो आहे, कोणत्या संघ संयोजनासह खेळणार, या सर्व गोष्टींबाबत त्याला कल्पना होती. आम्ही जेव्हा गाबामध्ये पोहोचलो तेव्हाही कोणता फिरकीपटू खेळणार याबाबत नक्की नव्हतं. गाबामधील खेळपट्टी तेथील स्थिती कशी असेल हे पाहून नंतर निर्णय़ घेतला जाणार होता.”

हेही वाचा – R Ashwin Retirement: रवीचंद्रन अश्विनने अचानक जाहीर केली निवृत्ती, गाबा कसोटीनंतर भारतीय चाहत्यांना मोठा धक्का

U

रोहित शर्मा पुढे म्हणाला, “मी जेव्हा पर्थमध्ये पोहोचलो तेव्हा याबाबत आम्ही चर्चा केली आणि मी कसंतरी त्याला त्याला पिंक बॉल कसोटीपर्यंत थांबण्यासाठी विनंती करत तयार केलं. त्याला वाटलं जर त्याचा आम्ही कसोटी मालिकेसाठी विचार करत नाही आहोत तर क्रिकेटला अलविदा करणं हा योग्य पर्याय असेल. ” अश्विन उद्या म्हणजेच १९ डिसेंबरला ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतण्यासाठी रवाना होणार असल्याचे रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितले.