Rohit Sharma Statement on Rishabh Pant Controversial Wicket: ऋषभ पंतच्या विकेटची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. भारत वि न्यूझीलंड यांच्यातील मुंबई कसोटीतील सामन्यात ऋषभ पंतला वादग्रस्त निर्णय देत बाद घोषित केले. ऋषभ पंत उत्कृष्ट अर्धशतक झळकावत मैदानात पाय रोवून घट्ट उभा होता आणि संघाला विजयाच्या दिशेने नेत होता. भारताला तिसऱ्या कसोटीत विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण ऋषभ पंत ५७ चेंडूत ६४ धावा करत बाद झाल्यानंतर भारताची उर्वरित फलंदाजी बाजू कोसळली आणि परिणामी भारताला पराभव पत्करावा लागला. ऋषभ पंतच्या या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत मोठे वक्तव्य केले आहे.

ऋषभ पंतला तिसऱ्या पंचांनी कसं काय आऊट दिलं?

मुंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पंतच्या खेळीच्या जोरावर १४७ धावांचा पाठलाग करताना ६ विकेट गमावून १०६ धावा केल्या होत्या. पंत ६४ धावा करत भारतीय संघाला विजयाच्या दिशेने नेत होता. त्यानंतर २२व्या षटकात एजाज पटेलच्या चेंडूवर न्यूझीलंड संघाने झेल पकडून बाद असल्याचे आवाहन केले. मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद घोषित केले, त्यानंतर कर्णधार टॉम लॅथमने रिव्ह्यू घेतला.

IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND vs NZ Sunil Gavaskar Smashes Plate While Lunch After Seeing Washington Sundar New Ball Against New Zealand Ravi Shastri
IND vs NZ: वॉशिंग्टन सुंदरमुळे सुनील गावसकरांनी जेवताना फोडली प्लेट, रवी शास्त्रींनी कॉमेंट्री करताना सांगितलं नेमकं काय घडलं?
Rohit Sharma Statement on India Series Defeat IND vs NZ Said I wasnt at my best with both bat and as a captain
IND vs NZ: “एक कर्णधार व फलंदाज म्हणून मी…”, भारताच्या दारूण पराभवानंतर रोहित शर्माचं भावुक वक्तव्य; व्हाईट वॉशचं खापर कोणावर फोडलं?
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित

हेही वाचा – IND vs NZ: “एक कर्णधार व फलंदाज म्हणून मी…”, भारताच्या दारूण पराभवानंतर रोहित शर्माचं भावुक वक्तव्य; व्हाईट वॉशचं खापर कोणावर फोडलं?

रिव्ह्यू घेतल्यानंतर तिसऱ्या पंचांनी तपासले असता, चेंडू बॅटजवळ असताना स्निको मीटरवर हालचाल दिसून आली. दरम्यान, पंतची बॅट पॅडला स्पर्श करत होती. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाल्याचे टीव्ही अंपायरला वाटले, तर पंतने बॅट आणि पॅडच्या संपर्कामुळे अल्ट्रा एजवर हालचाल होत असल्याचे सांगितले. पण तिसऱ्या पंचांनी मात्र मैदानावरील पंचांचा निर्णय डावलत त्याला बाद घोषित केले.

ऋषभ पंतने अवघ्या ४८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला झपाट्याने विजयाकडे नेत होता, मात्र तो एजाज पटेलच्या गोलंदाजीवर वादग्रस्त विकेटवर बाद झाला. ऋषभ पंतची ही विकेट सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली आणि भारताला पराभव पत्करावा लागला. रोहित शर्मानेही ऋषभ पंतच्या विकेटवर नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – WTC Points Table: भारताने गमावले पहिले स्थान, WTC गुणतालिकेत सलग ३ पराभवांनंतर बसला मोठा धक्का

ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा म्हणाला, “पंतच्या विकेटबद्दल काय बोलू काही कळत नाही. आम्ही काही बोललो तरी ते कोणी मान्य करणार नाही. कोणतेही ठोस पुरावे नसतील तर मैदानावरील पंचांनी दिलेला निर्णय मान्य करावा. मैदानावरील पंचांचा निर्णय कसा काय बदलू शकतात मला कळलं नाही, कारण मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिलं नव्हतं.”

“पंतची बॅट त्याच्या पॅडजवळ होती. पुन्हा तेच की मला माहित नाही मी हे सर्व बोलण्याची ही योग्य वेळ आहे की नाही. पंचांनी निर्णय देताना याचा विचार करायला हवा. सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा, आपल्या मनाप्रमाणे ते बदलू नका. आमच्या दृष्टीने त्याची विकेट खूप मोठा सेटबॅक होता. ऋषभ त्यावेळेला चांगल्या फॉर्मात होता आणि तो असता तर नक्कीच त्याने संघाला पुढे नेलं असतं. पण त्याची विकेट खूपच दुर्देवी होती”, असं रोहित पुढे म्हणाला.

Story img Loader