नवी दिल्ली : उपकर्णधार केएल राहुलला धावा करण्यासाठी झगडावे लागत असले, तरी संघ व्यवस्थापनाचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. मात्र त्याच वेळी भारतीय खेळपट्टय़ांवर धावा करण्यासाठी राहुलला विविध पर्याय शोधावे लागतील, असे वक्तव्य कर्णधार रोहित शर्माने केले.‘‘फलंदाजीला आव्हानात्मक खेळपट्टय़ांवर धावा करण्यासाठी तुम्ही फलंदाज म्हणून विविध पर्याय शोधले पाहिजेत. संघ व्यवस्थापन म्हणून आम्ही केवळ राहुल नाही, तर प्रत्येक खेळाडूची क्षमता आणि त्याच्यातील प्रतिभा लक्षात घेतो. आम्ही खेळाडूला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुरेशी संधी देतो,’’ असे रोहित म्हणाला. गेल्या सात कसोटी डावांमध्ये राहुलला एकदाही २५ धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.
राहुलचे स्थान कायम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी राहुलने भारतीय संघातील स्थान राखले आहे.
संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, इशान किशन</p>