पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत मोहम्मद आमिरचा चेंडू खेळताना रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली. भारताच्या डावाचा पहिला चेंडू रोहितच्या डाव्या पायाच्या बोटावर आदळला. दुसऱ्या चेंडूवर आमिरने रोहित शर्माला पायचीतकरवी बाद केले. रोहितच्या पायाची क्ष-किरण चाचणी घेण्यात आली आहे. भारताची पुढची लढत श्रीलंकेविरुद्ध मंगळवारी होणार आहे. त्यामुळे दुखापतीतून सावरण्यासाठी रोहितकडे वेळ आहे. आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पाठदुखी बळावली होती. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत दुखापतीमुळे शिखर धवन खेळू शकला नाही. गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीविषयी साशंकता आहे.

Story img Loader