IPL Awards Announce: १५ वर्षांपूर्वी याच दिवशी आयपीएलमध्ये पहिला लिलाव झाला होता. अशा परिस्थितीत, आयपीएलच्या या प्रवासाला १५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, स्टार स्पोर्ट्सने इनक्रेडिबल अवॉर्ड्स जाहीर केले. यादरम्यान आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड सर्वोत्कृष्ट कर्णधारापासून ते सर्वोत्कृष्ट फलंदाजापर्यंत एकूण ६ श्रेणींमध्ये करण्यात आली आहे.
१.सर्वोत्कृष्ट कर्णधार: मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवडला गेला. येथे त्याने एमएस धोनी, शेन वॉर्न आणि गौतम गंभीर यांना मागे टाकले. या तिन्ही खेळाडूंनाही या श्रेणीत नामांकन मिळाले होते.
२. सर्वोत्कृष्ट फलंदाज: हा पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सला मिळाला. या प्रकारात त्याने सुरेश रैना, ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले.
३.सर्वोत्कृष्ट गोलंदाज: जसप्रीत बुमराहला आयपीएलचा आतापर्यंतचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवडण्यात आले. या पुरस्काराच्या शर्यतीत बुमराहसह सुनील नरेन, राशिद खान आणि युजवेंद्र चहल यांचाही समावेश होता.
४. सर्वोत्कृष्ट एकूण प्रभावशाली खेळाडू: हा पुरस्कार वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलने पटकावल. आपल्या वेगवान फलंदाजी आणि गोलंदाजीत महत्त्वाच्या प्रसंगी विकेट्स घेत या खेळाडूने आपल्या संघाला अनेक वेळा कठीण परिस्थितीत सामने जिंकून दिलेत. विंडीजच्या या खेळाडूने शेन वॉटसन, राशिद खान आणि सुनील नरेन यांना या पुरस्कारात मागे टाकले.
५. एका मोसमातील सर्वोत्तम फलंदाजी: विराट कोहलीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विराटने आयपीएल २०१६ मध्ये ९७३ धावा केल्या होत्या. येथे विराटने ख्रिस गेल (२०११), डेव्हिड वॉर्नर (२०१६) आणि जोस बटलर (२०२२) यांच्या कामगिरीला मागे टाकले.
६. मोसमातील सर्वोत्तम गोलंदाजी: विंडीजचा फिरकी गोलंदाज सुनील नरेन येथे आघाडीवर राहिला. नरेनने आयपीएल २०२२ मध्ये फक्त ५.४७ च्या इकॉनॉमी रेटने २४ विकेट घेतल्या होत्या. नरेनने या पुरस्काराच्या शर्यतीत इतर नामांकित युजवेंद्र चहल (२०२२), जोफ्रा आर्चर (२०२०) आणि राशिद खान (२०१८) यांचा मागे टाकले.