Rohit Sharma surpasses Virat Kohli during IND vs BAN match : भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात केली. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियासमोर बांगलादेशचे आव्हान आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात खेळायला उतरताच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने विराट-धोनीसह युवराज सिंगला मागे टाकत एक मोठा पराक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झाला आहे. यापूर्वी, तो २०१३ आणि २०१७ मध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा भाग होता. अशाप्रकारे, कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीला मागे टाकत खास विक्रम केला आहे. खरं तर, रोहित शर्मा हा सर्वाधिक मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धा म्हणजेच विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी-२० विश्वचषक खेळणारा भारतीय खेळाडू बनला आहे.

रोहित शर्माने विराट कोहलीला टाकले मागे –

याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत मर्यादित षटकांच्या १५ आयसीसी स्पर्धा खेळल्या आहेत. यामध्ये ३ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक, ३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ९ आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धांचा समावेश आहे.

भारतासाठी सर्वाधिक मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धा खेळलेले खेळाडू (विश्वचषक + चॅम्पियन्स ट्रॉफी + टी२० विश्वचषक):

  • १५ वेळा – रोहित शर्मा* (३+३+९)
  • १४ वेळा – विराट कोहली*
  • १४ वेळा – एमएस धोनी
  • १४ वेळा – युवराज सिंग

सर्वाधिक आयसीसी स्पर्धा खेळण्याच्या बाबतीतही रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. रोहितने ३ एकदिवसीय विश्वचषक, ३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ९ टी-२० विश्वचषक आणि २ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन खेळले आहे. त्यानुसार, त्याने एकूण १७ आयसीसी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्याच वेळी, माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत १६ आयसीसी स्पर्धा खेळल्या आहेत.