Rohit Sharma tells selectors he will remain India Test captain : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा, बीसीसीआय, मुख्य प्रशिक्षक आणि निवडसमितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्यात नुकतीच आढावा बैठक पार पडली. ज्यामध्ये भारतीय संघाबद्दल सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. या बैठकीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाबरोबर रोहित शर्माच्या नेतृत्त्वावर चर्चा करण्यात आली. यावेळी कर्णधारपदाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला, अशी चर्चा आहे.

आढावा बैठकीत काय ठरलं?

बीसीसीआयसोबत झालेल्या आढावा बैठकीत रोहित शर्माने पुढील काही महिने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, रोहित शर्माने बीसीसीआयला नवीन कर्णधाराचा शोध सुरू ठेवण्यास सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयसोबतच्या बैठकीदरम्यान रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून बुमराहच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, परंतु काही लोक त्याच्याबद्दल संभ्रमात आहेत. इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो संघाचे नेतृत्व करू शकेल की नाही, याबाबत बुमराहच्या नावावर शंका होती.

Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Supriya Sule
Supriya Sule : वडिलांवर घणाघाती टीका झाल्यानंतरही सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया, अमित शाहांना म्हणाल्या…
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
Torres Scam
Torres Scam : टोरेस कंपनीचा सीईओ दहावी नापास, सीईओ दिसण्याकरता घालायचा फॉर्मल कपडे; पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक बाब उघड!

रोहित शर्मा काय म्हणाला?

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, रोहितने बीसीसीआयला आढावा बैठकीत सांगितले की, “बोर्ड भविष्यातील कर्णधाराची निवड करेपर्यंत तो पुढील काही महिने कर्णधार राहील. त्यानंतर जो कोणी निवडला जाईल त्याला त्याचा पूर्ण पाठिंबा असेल.” तसेच रोहित एकदिवसीय फॉर्मेटमध्ये भारताचा कर्णधार म्हणून कायम राहील. या फॉरमॅटमधील त्याच्या उत्तराधिकाऱ्याचा निर्णय आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर घेतला जाईल, असेही ठरले आहे.

हेही वाचा – Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

भारताची पुढील कसोटी मालिका ही जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांत पाच सामने खेळले जाणार आहेत. तत्त्पूर्वी भारतीय संघ १९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागाी होणार आहे. या स्पर्धेसाठी अजून भारतीय संघाची घोषणा करण्याती आलेली नाही. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघ जाहीर करण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.

Story img Loader