भारताचा सलामीवीर रोहित शर्माचा प्रेयसी रितिका सजदेहशी रविवारी विवाह झाला. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात भारतीय क्रिकेटमधील आजी-माजी दिग्गजांपासून ते उद्योगपती, राजकारणी, सिने तारे-तारकांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. या सर्वानी या नवदाम्पत्याला ‘नांदा सौख्य भरे..’ असा आशीर्वाद दिला.
या लग्नसोहळ्याला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अजंलीसह, भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसह, अजिंक्य रहाणे पत्नी राधिकासह, हरभजन सिंग पत्नी गीतासह जातीने हजर होते. तसेच गौतम गंभीर, सुरेश रैना, शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंग, व्ही.व्ही.एस लक्ष्मण या क्रिकेटपटूंसह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, विद्या बालन, सुनील शेट्टी, अथीया शेट्टी, बोनी कपूर व श्रीदेवी, सुष्मिता सेन, अमिषा पटेल या बॉलिवूड तारकांनी उपस्थिती लावली.